20/03/2020
दिनांक 15 मार्च 2020 रोजी अंगण लॉन आणि रिसॉर्ट नागाव उरण येथे सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज महिला मंडळ, आंगण लाॅन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्ताने मैत्रीण हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. महिला दिनाचे विविध कार्यक्रम रेलचेल असताना या कार्यक्रम अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला उरण च्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, वैशाली कोळगावकर, अनिता घरत गौरी मंत्री ईत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर आरसा ह्या कार्यक्रमाने सुरुवात झाली. महिलांना विविध प्रश विचारून सुजाण पालकत्व व रोजच्या जीवनातील कळत नकळतपणे होणाऱ्या पालकांच्या चुकांची जाणीव हसत खेळत या कार्यक्रमातून करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला व विजेत्यां महिलांचा पारितोषिके देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर संगीत खुर्ची हा खेळ घेउन विजेत्या महिलेला मानाची पैठणी देण्यात आली. त्यानंतर फॅशन शो घेउन प्रत्येक महिलेला सहभागी करून घेण्यात आले विजयी महिलांना ताज देऊन सन्मानित केले आणि उपस्थित महिला मधून 7 विशेष सौंदर्यवती निवडल्या त्यांना ताज देऊन सन्मान केला.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. ह्या कार्यक्रमा अंतर्गत sea bird school vishes मुलांची शाळेमधील महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा ही सन्मान करण्यात आला. या विशेषतः 200 हुन अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.