तथास्तु

तथास्तु One Stop Solution for all your worries about your Family, Business, Social, Political & Corporate Ev

श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना मंगलमय शूभेच्छा।🙏🙏🙏Tathastu Event planning & Management,Ujjain
27/08/2025

श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना मंगलमय शूभेच्छा।
🙏🙏🙏
Tathastu Event planning & Management,Ujjain

15/04/2025

*श्रीमद्भगवद्गीता सार चिंतन - अंक ३६*

*अध्याय ४ : ज्ञानसंन्यासयोग*

*भाग ७ : भगवंताच्या अवताराचे प्रयोजन*

*यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत l अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम् lI (४.७)*

*परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ll (४.८)*

श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, ते प्रत्येक युगात धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी अवतार घेतात. साधूंचे संरक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा नाश करण्यासाठी ते पृथ्वीतलावर प्रकट होतात. हा श्लोक सांगतो की भगवंत केवळ पापी जनांचा किंवा दुष्ट वृत्तीच्या लोकांचा नाश करण्यासाठी नव्हे तर सत्य आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात.

*या श्लोकांच्या गहन शिकवणी:*

1. *सत्कर्मांचे संरक्षण:* भगवंत सतत साधूंचे आणि धर्मनिष्ठ लोकांचे रक्षण करतात. ज्यांचा मार्ग सत्संग आणि भक्तीचा आहे, त्यांना ईश्वराचे पाठबळ असते.

2. *अधर्माचा नाश:* अधर्म, अन्याय आणि अनीती जेव्हा समाजात वाढते, तेव्हा भगवंत त्याचा नाश करण्यासाठी आणि सत्य पुनर्स्थापित करण्यासाठी अवतार घेतात.

3. *धर्माची पुनर्स्थापना:* भगवान श्रीकृष्ण केवळ संकटाचे निवारण करण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीही पृथ्वीतलावर येतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने सत्य, न्याय आणि नीतिमत्तेचा अंगिकार केला पाहिजे.

4. *भगवंताचे अनंत अवतार:* हा श्लोक सांगतो की भगवान वेळोवेळी, युगानुयुग धर्म रक्षणासाठी अवतार घेतात. म्हणूनच भक्तांनी सदैव श्रद्धा ठेवावी की भगवंत आपल्या रक्षणासाठी सदैव तयार असतात.

5. *कर्तव्य आणि कर्मयोग:* हा श्लोक आपल्याला शिकवतो की प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडावे. समाजात धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यायला हवे.

*हे दोन्हीं श्लोक भक्तांसाठी प्रेरणादायी असून ते आपल्याला धर्माच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करतात. आपणही सत्य, नीतिमत्ता आणि न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी कार्य करूया!*

॥जय जय रघुवीर समर्थ॥

सादर,
डॉ. अश्विन भागवत
हेड - प्रोजेक्ट्स एंड मार्केटिंग
पी.एम. प्रोजेक्ट्स एंड सर्विसेस प्रा. लि., इंदौर

02/01/2025

*श्रीमद्भगवद्गीता सार चिंतन - अंक १२*

*अध्याय २: सांख्य योग*

*भाग ३ : आत्म्याचे अमरत्व*

श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचे शाश्वत स्वरूप समजावतात.

आत्मा कधीही मरत नाही; तो अविनाशी आहे, तर शरीर नश्वर (नाशवंत) आहे आणि आत्मा शरीर बदलण्याप्रमाणेच नवीन शरीर धारण करतो.

_*"आत्मा शस्त्रांनी छेदला जाऊ शकत नाही, अग्नीने जाळला जाऊ शकत नाही, पाण्याने ओला केला जाऊ शकत नाही, आणि वाऱ्याने वाळवला जाऊ शकत नाही."*_

आत्मा हा भौतिक जगाच्या सर्व प्रकारच्या मर्यादेपलीकडे आहे. कोणत्याही भौतिक घटकांचा आत्म्यावर परिणाम होत नाही.

मृत्यू हा आत्म्यासाठी फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचा मार्ग आहे.

आत्म्याचे वर्णन हे अद्वैत सिद्धांताचे प्रतीक आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून तो कधीही नष्ट होत नाही.

आत्मा स्थिर आणि अविनाशी असल्यामुळे, मानवाने भौतिक मोहांपासून मुक्त होऊन त्याच्या शाश्वत स्वरूपाकडे लक्ष दिले पाहिजे. ह्यालाच आत्मबोध किंवा आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान हेच मानवाच्या सर्व दु:खांचे निवारण करू शकते. आत्म्याचे ज्ञान म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा आणि मुक्तीचा प्रारंभ आहे.

॥जय जय रघुवीर समर्थ॥

सादर,
डॉ. अश्विन भागवत
हेड - प्रोजेक्ट्स एंड मार्केटिंग
पी.एम. प्रोजेक्ट्स एंड सर्विसेस प्रा. लि., इंदौर

23/08/2023
11/03/2022

Marathi Wedding Experts

Tathastu Event Planning & Management

"मराठी विवाह सोहळ्याचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन आपल्या अपेक्षित बझट मध्ये"

आपल्या येथे लग्न ठरले आहे ? तयारीला वेळ कमी आहे ? मग तथास्तु आहे न आपल्या सेवे साठी ! अधिक माहितीसाठी 99937 57399 अथवा 98260 24137 या नंबर वर फोन करा !

13/09/2021

 आपल्या येथील विवाह-सोहळा आपल्या आणि पाहुण्यांच्या स्मृतीत चिरकाळ राहो असे आपले स्वप्न आहे कां ?
 विवाह सोहोळयात येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय न होवो, चार दिवसांसाठी येणाऱ्या आपल्या नातेवाईकांवर कुठल्याही कामाचा भार न पडो, त्यांना उन्मुक्तपणे सोहोळयाचा आनंद घेता यावे असे आपणांस वाटते कां ?
 वधूच्या आईवडिलांनी आणि भाऊ –बहिणीने दोन दिवस तणाव-मुक्त राहून, विविध प्रसंगी मस्त तयार होऊन विवाह सोहोळयाचा आनंद घ्यावा असे आपणांस वाटते कां ?
 आपण विवाह सोहळा विना अपव्यय करता थाटा-माटाने करण्यास इच्छुक आहात कां ?
 आपण विवाह सोहोळयात येणाऱ्या खर्चाचा आपल्याला उत्तम मोबदला (Value for Money) मिळावा असे वाटते कां ?
 आपल्यास असे वाटते कां की सर्व व्यवस्था विना आपण स्वत: लक्ष घालता वेळेपूर्वी आणि चोख झाल्या पाहिजे आणि दोन दिवस आपण पूर्ण तणाव-मुक्त राहावे ?
 आपल्याला असे वाटते कां की तथास्तु आपण ठरविलेल्या अन्य वेंडर्सकडूनही नकळत उत्तम सेवा करवून घेईल व त्याचा आपल्यावर जरा पण तणाव येणार नाही ?
 तथास्तुच्या कार्यशैली, व्यवस्थापन कौशल्य, गुणवत्ता आणि ग्राहक-संतुष्टी बद्दल आपण परिचित आहात कां ? नसल्यास ग्राहकांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यांच्याशी विचारपूस करून खात्री करून घ्यावी !
 आपला तथास्तुवर विश्वास आहे कां ? कारण कुठल्याही व्यवहारात विश्वास असणे अतिशय गरजेचे आहे.
वरील सर्व प्रश्नांचे उत्तर जर ‘हो’ असेल ‘तरच’ आपण तथास्तुला संधी देण्याबद्दल विचार करावा !

शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
05/09/2021

शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

5 Vidya Nagar, Lal Bahaddur Shastri Marg, Ujjain (M. P. )
Ujjain
456010

Opening Hours

Monday 5pm - 9pm
Tuesday 5pm - 9pm
Wednesday 5pm - 9pm
Thursday 5pm - 9pm
Friday 5pm - 9pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919826024137

Alerts

Be the first to know and let us send you an email when तथास्तु posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to तथास्तु:

Share