09/08/2024
विषय -अंकशास्त्र
लेखन - मूलांक, भाग्यांक ,नामांक
संदर्भ - ज्योतिष सोबती, दिक्षित सर (ज्योतिष शास्त्री)
लेखक - धनश्री स्वामी
काय असतं मूलांक?
मूलांक : जन्मतारखेलाच मूलांक म्हणतात. मूलांक 1 ते 9 असे असतात. जन्मतारखेत दहावा क्रमांक असल्यास दोन्ही संख्या जोडून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, जर जन्मतारीख 28 असेल तर मूलांक 2 + 8 = 10 = 1 असेल. वेगवेगळ्या संख्या वेगवेगळ्या ग्रहांच्या मालकीच्या असतात.
मूलांक काय दर्शवतं : मूलांक खरं तर लग्न किंवा राशीचक्राचे काम करतात. त्यातून व्यक्तीचा स्वभाव आणि शरीर रचना याबद्दल माहिती मिळते. हे एखाद्या व्यक्तीचे चरित्र स्पष्ट करते, त्याची मनःस्थिती आणि आरोग्य सांगते.
काय असतं भाग्यंक?
भाग्यांक : जन्मतारखेच्या सर्व अंकाचा जोड केल्यावर जो अंक प्राप्त होतो त्याला भाग्यांक म्हणतात. जसे आपली जन्मतिथी 2-3-1970 असेल तर जोड 2+3+1+9+7+0 = 22 =2+2=4 होत यात भाग्यांक 4 असेल.
भाग्यांक काय दर्शवतं : भाग्यांक पंचम आणि नवम भाव दर्शवतं. हे जीवनातील चढ-उतार, यश, भाग्याचा काळ इत्यादी स्पष्ट करू शकतं. भाग्यांक देखील 1 ते 9 पर्यंत आहे. एखाद्या व्यक्तीचा भाग्य क्रमांक आणि मूलांक एकच असेल किंवा मित्र क्रमांक असेल तर त्या व्यक्तीला यश मिळते.
काय असतं नामांक?
व्यक्तीच्या नावाची अक्षरे जोडल्यानंतर जो क्रमांक मिळतो त्याला त्या व्यक्तीच्या नावाचा क्रमांक म्हणतात. संख्याशास्त्राच्या आधारे नावाचे स्पेलिंग बदलणे हे प्रामुख्याने भाग्यांकावर आधारित आहे.
अंकशास्त्रानुसार -
*१* या अंकावर रवि या ग्रहाचा चा अंमल असतो १,१०, १९, २८) या अंकावर जन्मलेला जातक बुध्दीमान स्वतंत्र ,विचारी, धाडसी, संशोधक वृत्ती , पुढारी, हरहुन्नरी, अशी शुभ फले मिळतात परंतू ही व्यक्ती स्पष्ट वक्ता हट्टी अहंकारी व खर्चिक असतात.
मित्र अंक -१ ,३,४,५,७,९
शत्रू अंक -२,६,८
शुभ रंग - पिवळा , गुलाबी , ऑफ व्हाईट
अशुभ रंग - काळा, नीळा
शुभ रत्न - माणिक , पुष्कराज
*२* - या अंकावर चंद्राचा अंमल असतो (२,११,२०, २९) शुभफले आपुलकी , प्रेमळ ,साहचर्य, सोज्वळ, सत्यवादी,ध्येयवादी भावना प्रधान व निसर्गप्रेमी
दोष - थंड प्रकृती, मत्सर, संशयी वृत्ती
मित्र अंक - २,४,६,९
शत्रू अंक - १,३,५,७,८
शुभ रंग - क्रीम, पिवळा, गुलाबी, पांढरा, लाल , डार्क हिरवा
अशुभ रंग - काळा अन् वांगी कलर
शुभ रत्ना - मोती
🙏🏻
धनश्री स्वामी,
ज्योतिष शास्त्री,
मांगल्या वधू - वर सूचक केंद्र
सोलापूर