12/08/2026
सखी आरोग्यवती उपक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद...!
मोफत आरोग्य तपासणीसह सखींनी घेतला निरोगी राहण्याचा कानमंत्र...
महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, आजारांचे वेळेवर निदान व्हावे आणि आधुनिक उपचारपद्धतींबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने लोकमत सखी आणि विजापूर रोड येथील माधवबाग कार्डियाक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 09 ऑगस्ट रोजी एसपीएम इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सभागृहात 'सखी आरोग्यवती' या विशेष आरोग्याविषयी मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणीचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यास सखी सदस्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.