21/01/2020
"मनोहर मंगल कार्यालय" ही संकल्पना, आम्हाला सुचविली, ती अजय बदामीकर आणि कै. आबा बदामीकर यांनी ...तेव्हा साल होते , 1991 !!
आम्ही त्या वेळी आमचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय , मेहेंदळे गॅरेज इथून च करत होतो. पण हळूहळू ,वाहतुकीच्या वाढत्या समस्येमुळे , आमच्या अवजड ट्रक्स नी जा ये करणे दुरापास्त होऊ लागले आणि याच समस्येमुळे , कार्यालय करण्याची संकल्पना आता जोर धरू लागली. त्यानुसार आम्ही रीतसर याचा प्रोजेक्ट् रिपोर्ट तयार केला आणि आपल्या , तथाकथित, लाडक्या , जिव्हाळ्याच्या , महाराष्ट्र बँकेत सादर केला .. अपेक्षे प्रमाणे , या बँकेने तो दुर्लक्षित केला ,पण आम्हाला दुसरी कडून लोन घेण्यासाठी , ना हरकत प्रमाण पत्र दिले , हे ही नसे थोडके !! या बँकेने ,त्या वेळी महाराष्ट्रीयन लोकांना लोन द्यायचेच नाही असे ठरवले असावे . तरी बरे आमचे त्यांचेकडे 1960 पासून खाते आहे ... आज पर्यंत !!!
असो !!
या दरम्यान , भगिनी निवेदिता बँकेने तत्परतेने , आम्हाला लोन दिले . त्यांनी आपले संचालक मंडळ आमच्या जागेची पाहणी करण्यास पाठवले आणि तात्काळ लोन मंजूर झाले.
आणि अशा प्रकारे , 1996 , च्या जानेवारीस हे कार्यालयाचे , श्री भाऊसाहेब चितळे यांचे हस्ते उदघाटन होऊन कार्यरत झाले !!
परमेश्वर कृपेने , आमच्या या कार्यालयाची उत्तोत्तर प्रगती होऊ लागली , नावारूपास येऊ लागले . समारंभाचे केटरिंग सुरवाती पासून , श्री बदामीकर करत होते , पण आता गेल्या 2 वर्षांपासून , ते आम्हीच बघतो .
या सर्व प्रवासात , आपल्या सारख्या सुहृदांनी, हितचिंकांनी, शेजाऱ्यांनी, ज्या शुभेच्छा, आशीर्वाद दिले , त्यामुळेच आमची अशी प्रगती होऊ शकली !!
या निमित्तं , आम्ही सर्व मेहेंदळे कुटुंबीय आपल्याला, मनःपूर्वक, धन्यवाद देतो ...
- श्याम मनोहर मेहेंदळे