Raagi Events

Raagi Events Online events for the betterment of society!

एकलव्य मंडळ तिडके कॉलनी, रागी इव्हेंट्स आणि नेट कॉम्प्युटर्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने *कृत्रिम बुद्धिमत्ता(AI...
11/06/2025

एकलव्य मंडळ तिडके कॉलनी, रागी इव्हेंट्स आणि नेट कॉम्प्युटर्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने *कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय प्रतिभेसाठी जागतिक संधी* या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी डॉ. दीपक शिकारपूर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला नक्की या 😊
04/06/2025

कार्यक्रमाला नक्की या 😊

08/05/2025

रागी इव्हेंट्स आयोजित संभाषण कौशल्य या विषयावर आधारित तिसरी कार्यशाळा. संभाषण कौशल्याचे व्यावहारिक आयुष्यात कसे महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. 7 ते 14 वयोगटातल्या मुलांचा या दहा दिवसीय कार्यशाळेला खूप छान प्रतिसाद मिळाला.

 रागी इव्हेंट्स आयोजित संस्कारवर्ग कार्यशाळा. हा पहिलाच प्रयोग होता जो यशस्वी झाला. सगळ्यांचे आभार 😊
05/02/2025



रागी इव्हेंट्स आयोजित संस्कारवर्ग कार्यशाळा. हा पहिलाच प्रयोग होता जो यशस्वी झाला. सगळ्यांचे आभार 😊

नक्की सहभागी व्हा 😊
19/11/2024

नक्की सहभागी व्हा 😊

18/11/2024

नमस्कार,

मी ऋचा मुळे. रागी इव्हेंट्स ही माझी फर्म आहे आणि त्यामार्फत मी लहान मुलांसाठी संस्कारवर्ग कार्यशाळा सुरू करत आहे.

15 दिवस संध्याकाळी होणाऱ्या कार्यशाळेत विविध श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र अर्थासहित, उच्चारण पद्धती, बोधपर किंवा पौराणिक कथा, संभाषण कौशल्य या विषयाची तोंडओळख हे शिकवण्यात येईल.

सदर कार्यशाळा ही 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर यादरम्यान असेल.
कार्यशाळेची वेळ - संध्याकाळी 5 ते 6
कार्यशाळेची - फी 500/-
ठिकाण - शाकंभरी मंदिर, शारदा कॉलनी,पिंपळे निलख, पुणे.
वयोगट - 4 ते 12

तुम्ही यासाठी इच्छुक असल्यास तसे सांगावे. फक्त तीस विद्यार्थी यामध्ये घेण्यात येतील.

फी आणि नाव नोंदणी 20 नोव्हेंबर पर्यंत करावी.

5 डिसेंबरला विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. सहभागाचे. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

संपर्क - 9423766644

खूप दिवसांनी रागी इव्हेंट्स मार्फत कार्यक्रम झाला.दिवाळी पहाट. गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम होत आहे आणि दरवर्षी र...
31/10/2024

खूप दिवसांनी रागी इव्हेंट्स मार्फत कार्यक्रम झाला.दिवाळी पहाट. गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम होत आहे आणि दरवर्षी रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही कलाकारासाठी रसिकांचा प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे.

रागी इव्हेंट्स आणि अथर्वशीर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. सुंदर सकाळ, सुरेल गायक/ गायिका सोबत तबला, पेटी या वाद्यांची अप्रतिम जोड आणि समोर भरभरून दाद देणारे रसिक प्रेक्षक असा हा परिपूर्ण कार्यक्रम. असेच परिपूर्ण कार्यक्रम दरवर्षी घडो आणि तुम्हा सगळ्यांची साठी मिळो.

तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची जावो 🎇🪔😊



सुट्टी संपत आली. सुट्ट्यांमध्ये खूप मजा केली आणि आता लवकरच शाळा सुरू होणार.  म्हणून रागी इव्हेंट्सने लहान मुलांसाठी अभिन...
24/05/2024

सुट्टी संपत आली. सुट्ट्यांमध्ये खूप मजा केली आणि आता लवकरच शाळा सुरू होणार. म्हणून रागी इव्हेंट्सने लहान मुलांसाठी अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे. ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका देशपांडे या मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यासाठी कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा.

12/11/2023

अथर्वशीर्ष मंडळ आणि रागी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट- २०२३ हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला.

*अथर्वशीर्ष मंडळ खराडी आणि रागी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित*           *सुरेल सुमधुर गीतांची मैफिल*      ...
07/11/2023

*अथर्वशीर्ष मंडळ खराडी आणि रागी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित*


*सुरेल सुमधुर गीतांची मैफिल*
*दिवाळी पहाट*
वर्ष चौथे

*दिपावली निमित्त सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.*

आपले खराडी नगर बहुभाषिक असले तरी, आपण पुण्यात राहत असल्यामुळे, आपल्याभागात मराठी कार्यक्रम व्हावे अशी या भागातील बऱ्याच नागरिकांची इच्छा असते. आणि म्हणून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे पहिले दोन वर्ष ऑनलाईन आणि गेल्या वर्षी प्रत्यक्ष सादरीकरण आम्ही केले होते.

कळविण्यास आनंद होतो की दिवाळी निमित्त यावर्षी देखील, सुरेल सुमधुर गाण्यांची मैफिल आम्ही आयोजित केली आहे.

या मैफिलीची विशेषता म्हणजे, सर्व गायक-गायिका-वादक पुण्याच्या पूर्व भागातील संगीत क्षेत्रातील उत्तम कलाकार आहेत.

*कार्यक्रम दिनांक -*
*शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३*

*कार्यक्रमाची वेळ-*
*सकाळी ठीक ६ ते ८*

*कार्यक्रमाचे स्थान -*
*मियो प्लाझो सोसायटी*
*मे फेयर व डी मार्ट समोर,*
*श्रीराम चौक, खराडी, पुणे*

*गायक कलाकार -*
हिमांगी विश्वरुप, समीर मोहिते, डॉ.गौरी जोशी, अंजली जोशी, नीता गंगापुरकर, अनिरुध्द गद्रे, सुषमा देसाई

*संवादिनी साथ* -प्रिया केळकर गांगुली
*तबला संगत* -राम भालेकर
*सूत्रसंचालन* - ऋचा मुळे

*कार्यक्रमाचा व दिवाळी निमित्त अल्पोपहार-चहाचा आस्वाद घ्यायला, आपण सहपरिवार परिचितांसह यावे* याकरिता हे आग्रहाचे निमंत्रण.


उन्हाळी सुट्टी सुरू झाली की पालकांना मुलांसाठी मोठा प्रश्न असतो रोज नवीन असं काय शिकवायच ?तुमचा हा प्रश्न आम्ही दूर करत ...
07/05/2023

उन्हाळी सुट्टी सुरू झाली की पालकांना मुलांसाठी मोठा प्रश्न असतो रोज नवीन असं काय शिकवायच ?

तुमचा हा प्रश्न आम्ही दूर करत आहोत आणि तुमच्या पाल्यांसाठी खास *रागी इव्हेंट्स तर्फे उन्हाळी कार्यशाळा*

१३ आणि १४ मे रोजी दुपारी ३ ते ६ ही कार्यशाळेची वेळ आहे. गाणी, ड्रॉइंग, नृत्य, खेळ अशा विविध गोष्टींनी ही कार्यशाळा रंगणार आहे.

तुमच्या पाल्यांना या धमाल कार्यशाळेत नक्की पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क -
श्वेता - 8087501625
ऋचा - 9423766644

Address

Pune
411027

Telephone

+919423766644

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raagi Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category