शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे, Performance & Event Venue, Pune.

तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन...शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे, कसबा गणपती वस्ती व गण...
09/06/2025

तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन...
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे, कसबा गणपती वस्ती व गणेशोत्सव मंडळांचे वतीने आयोजित कार्यक्रमात प्रबोधिनीच्या महिला सेवाव्रती शाहीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज शक ३५२.
दि. ९ जून २०२५
🚩🚩🚩





|| पोवाडा प्रशिक्षण वर्ग समारोप ||कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांचा सत्ताविसाव्वा स्मृतीदिन समारोह रविवार दि. १ जून २०२५...
03/06/2025

|| पोवाडा प्रशिक्षण वर्ग समारोप ||

कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांचा सत्ताविसाव्वा स्मृतीदिन समारोह रविवार दि. १ जून २०२५ रोजी पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे. येथे संपन्न झाला.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थीचे सादरीकरण करतानाचे व कार्यक्रमाची काही क्षणचित्रे!

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे
.
.
.



आग्रहाचे निमंत्रण...१ जून २०२५🌺💐
31/05/2025

आग्रहाचे निमंत्रण...
१ जून २०२५🌺💐

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यांच्या खोली समोर सावरकरांनी लिहिलेला जयोस्तुते ...
31/05/2025

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यांच्या खोली समोर सावरकरांनी लिहिलेला जयोस्तुते गण सादर करताना शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे विद्यार्थी 🙏🏻

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे |




स्व. शाहीर जयराम नारगोलकर स्मृती बालशाहीर पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळे...
25/05/2025

स्व. शाहीर जयराम नारगोलकर स्मृती बालशाहीर पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत कलाग्राम येथे झाला.
पुरस्कारार्थी : बालशाहीर शौर्य हेमंत निंबाळकर (खोपोली)
पुरस्कार वितरण
हस्ते : मान. श्री. राजेंद्र वालेकर (उपाध्यक्ष - जनसेवा सहकारी बँक, पुणे)
विशेष उपस्थिती : मान. श्री. विद्याधर नारगोलकर

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे

शाहिर हेमंतराजे मावळे म्हणजे आपले बाबा यांना शाहिरी क्षेत्रात केलेल्या निरंतर साधने बद्दल |अटल साधना पुरस्कार| देण्यात आ...
30/01/2025

शाहिर हेमंतराजे मावळे म्हणजे आपले बाबा यांना शाहिरी क्षेत्रात केलेल्या निरंतर साधने बद्दल |अटल साधना पुरस्कार| देण्यात आला
खूप खूप अभिनंदन बाबा ❤️

शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे !

शाहीरमहर्षी आत्माराम पाटील जन्मशताब्दीपूर्ती निमित्त आत्म शाहिरी व्याख्यान व सादरीकरण!शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२४
09/11/2024

शाहीरमहर्षी आत्माराम पाटील जन्मशताब्दीपूर्ती निमित्त आत्म शाहिरी व्याख्यान व सादरीकरण!
शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२४

शाहीरमहर्षी आत्माराम पाटील* जन्मशताब्दीपूर्ती निमित्तआत्म शाहिरी व्याख्यान व सादरीकरण" शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ सा...
09/11/2024

शाहीरमहर्षी आत्माराम पाटील*
जन्मशताब्दीपूर्ती निमित्त
आत्म शाहिरी व्याख्यान व सादरीकरण" शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२४
सायं. ठीक ६ वा.
♦️ *आत्म शाहिरी, शाहिरी कार्यक्रम*
♦️ *व्याख्यान*
विषय : लोकसाहित्यातील आत्म शाहिरी
*स्थळ* :
श्री नारद मंदिर, सदाशिव पेठ, भिकारदास मारुती मंदिरामागे, पुणे ३०.
*नम्र आवाहन*
सायं. ५-३० ते ६ या वेळात चहापान व स्वागत.
कृपया वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती.
♦️♦️♦️🙏🙏🙏

आपली दिवाळीविशेष व वंचित मुलं मुली व आजीआजोबां बरोबरशाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या " पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या" वतीने...
29/10/2024

आपली दिवाळी
विशेष व वंचित मुलं मुली व आजीआजोबां बरोबर

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या " पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या" वतीने दर वर्षी प्रमाणे दिवाळीच्या सुरुवातीला अगोदरच्या रविवारी आपण *आपलं घर* या संस्थेतील उपेक्षित व विशेष मुलांसोबत *आपली दिवाळी* साजरी केली
यावर्षी आपण आपलं घरच्या ६० विशेष मुला-मुलींना व आजी-आजोबांना दिवाळीच्या भेटवस्तु म्हणून रोजच्या उपयोगाच्या वस्तू दिल्या आणि त्यांच्या सवे दिवाळी साजरी केली आणि शोभेचे फटाके उडविले
*रविवार दि.२७ ऑक्टोबर २०२४ रोजी*
*स्थळ- आपलं घर ,डोणजे , गोळेवाडी ,किल्ले सिंहगडच्या पायथ्याशी.*

ज्येष्ठ पखवाज गुरू पांडुरंग दातार यांना लोकशिक्षक पुरस्कार प्रदान.पुणे दि. ५ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मं...
04/09/2024

ज्येष्ठ पखवाज गुरू पांडुरंग दातार यांना लोकशिक्षक पुरस्कार प्रदान.
पुणे दि. ५ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ व ठाकूर परिवाराच्या वतीने कलासाधक व ज्येष्ठ पखवाज गुरु पांडुरग दातार यांना लोकशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सनई चौघड्याच्या मंगल स्वरात पाषाण येथील पांडुरंग दातार यांचे निवासस्थानी अंगणात रांगोळी व दारावर मांगल्याचे तोरण बांधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ शिक्षक व शाहीर स्व. शशिकांत ठाकूर स्मरणार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांतर्गत मानाचा शाहिरी फेटा, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर त्याचबरोबर शिरीष मोहिते, आनंद सराफ व अमर लांडे उपस्थित होते.
कलासाधाक व पखवाज गुरु पांडुरंग दातार यांनी स्व. भीमसेन जोशी, ज्येष्ठ कीर्तनकार स्व. बाबा महाराज सातारकर यांसारख्या अनेक ज्येष्ठ कलावंतांना पखवाज वादनाची साथ केली असून त्यांचे हजारो शिष्य महाराष्ट्रात आपल्या वादनाने कलासाधना करत आहेत. आजही पखवाज वादनाचे वर्ग पाषाण येथील निवासस्थानी दातार चालवतात.
कार्यक्रमात दातार गुरुजींनी पखवाज वादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले.

।। लोकशिक्षक पुरस्कार २०२४ ।।शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी , सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी ज्येष...
03/09/2024

।। लोकशिक्षक पुरस्कार २०२४ ।।
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी , सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी ज्येष्ठ शिक्षक व शाहीर कै.शशिकांत ठाकूर सर यांच्या स्मरणार्थ कलेच्या माध्यमातून आपले अनेक शिष्य घडविणाऱ्या शिक्षकाला "लोकशिक्षक पुरस्कार" देऊन गौरविण्यात येते. यंदाचा १७व्वा पुरस्कार "ज्येष्ठ पखवाज वादक पांडुरंग तथा आप्पा दातार" यांना बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वा. त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मान. प्रदीप नाईक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न होईल.
स्थळ : मा. आप्पा दातार यांचे पाषाण येथील रहाते घर.

निमंत्रक :
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे
शिरीष वि. मोहिते
पराग श. ठाकूर
संपर्क : ९४२२०२९२४७

शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कारयुवा संगीतकार द्वय हर्ष-विजय यांना जाहीरपुणे दि.२१ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी , पुणे ...
22/08/2024

शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार
युवा संगीतकार द्वय हर्ष-विजय यांना जाहीर

पुणे दि.२१ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी , पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा "शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार" संगीतकार द्वय हर्ष-विजय यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे पु.मावळे यांनी दिली.
या पुरस्काराचे यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. मानाचा शाहिरी फेटा , मोत्याचा शिरपेच , स्मृतीचिन्ह आणि रुपये ११,०००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
हर्ष-विजय ही युवा संगीतकारांची जोडी आपल्या नवनवीन रचना तयार करून महाराष्ट्रीय लोकसंगीत जतन करण्याचे काम करत आहे. त्यांच्या या प्रवासातील ही प्रबोधिनीची कौतुकाची थाप व शाहीररत्न किसनराव हिंगे यांचे आशीर्वाद.

श्री.अमित पां.पवळे
प्रचार - प्रसिद्धी प्रमुख
Aacharya Shahir Hemantraje Mavale Vijay Kapse Harsh Raut

Address

Pune

Telephone

+919422029247

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे:

Share