18/04/2026
*आत्मपरिक्षणाची गरज...*
*आपली 👥 संगत आपल्याला घडवते…*
*आपण ज्या लोकांमध्ये राहतो, त्यांच्यासारखेच विचार, सवयी आपल्यात हळूहळू निर्माण होत जातात. म्हणूनच चांगल्या लोकांची संगत ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.*
*हुशार, समजूतदार, प्रेमळ, दूरदृष्टी, कल्पकता, निडर असणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या व्यक्तींसोबत राहिल्यास आपल्यात सुद्धा चांगले बदल घडू लागतात.*
*नेतृत्वगुण, सकारात्मक विचारसारणी, बोले तैसा वागे , कृतीशील आणि दूरदृष्टी असणाऱ्या लोकांच्या सहवासात आपला आत्मविश्वास प्रचंड वाढतो, विचार समृद्ध होतात आणि आयुष्याला (व्यवसायाला) योग्य अशी दिशा मिळते.*
*संगत फक्त वेळ घालवण्यापुरती नसते, ती आपल्याला घडवणारी अदृश्य शक्ती असते. योग्य संगत आपल्यातील सुप्त गुणांना जागृत करते आणि आपल्याला एक उत्तम व्यक्ती बनवते.
*आज अशाच सकारात्मक विचारांच्या प्रवासात अनेक जण *“श्री सखी परिवारासोबत” जोडले गेले आहेत. इथे फक्त काम नाही, कामचलाऊ व्यवसाय नाही. तर इथे शिस्त आहे, सहानुभूती आहे, समजून घेण्याची क्षमता आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, भरारी घेण्यासाठी आत्मविश्वास आहे.
*एकमेकांकडून व्यक्तिमत्त्व घडवण्याची, शिकण्याची आणि आपल्या व्यवसायात अमुलाग्र बदल घडविण्याची तसेच इतरांना मदत, सहकार्य करून सोबत घेऊन पुढे जाण्याची दुरदृष्टी संधी मिळते.*
*मनुष्य हा स्वभावतः समाजप्रिय भावना प्रधान प्राणी आहे.* तो ज्या लोकांच्या सहवासात राहतो, त्याचा त्याच्या विचारांवर, वागणुकीवर आणि आयुष्याच्या दिशेवर मोठा प्रभाव पडतो. म्हणूनच सकारात्मक, प्रेमळ, हुशार आणि दूरदृष्टी असणाऱ्या लोकांची संगत ही आपल्या जीवनासाठी अत्यंत मौल्यवान ठरते.
*सकारात्मक विचारसरणी असणारे लोक नेहमी आशावादी असतात. अडचणींच्या काळातही, प्रतिकुल परिस्थितीतही ते निराश न होता उपाय शोधण्यावर जास्त भर देतात.
अशा लोकांच्या सहवासात राहिल्यास आपल्या मनातही आत्मविश्वास वाढतो आणि समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता अंगीकारण्याची प्रेरणा/ऊर्जा मिळते.
प्रेमळ आणि 👥 समजूतदार लोक आपल्याला भावनिक आधार देतात. ते इतरांच्या भावना समजून घेतात आणि सहानुभूती दाखवतात. त्यांच्या सहवासामुळे आपल्यातही माणुसकी, सहकार्य आणि आपुलकीची भावना विकसित होते. त्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट आणि टिकाऊ बनतात.
हुशार आणि ज्ञानसंपन्न लोक आपल्या विचारांना चालना देतात. त्यांच्या अनुभवातून , मार्गदर्शनातून आणि ज्ञानातून आपण नवनवीन गोष्टी शिकतो. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि चुका टाळण्यास मदत करतात. अशा लोकांच्या संगतीमुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते आणि निर्णयक्षमता सुधारते.
दूरदृष्टी असणारे लोक भविष्याचा विचार करून निर्णय घेतात. ते केवळ वर्तमानात न राहता पुढील संधी , बदल आणि आव्हाने चपलख ओळखतात. त्यांच्या सहवासामुळे आपणही दीर्घकालीन विचार करायला शिकतो आणि आपल्या जीवनाचे व्यायसायिक योग्य नियोजन अधिक प्रभावीपणे करू शकतो.
अशा चांगल्या लोकांच्या संगतीमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. आपले विचार सकारात्मक बनतात, आपली वागणूक सुधारते आणि जीवनात यश मिळवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणूनच, आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, त्यांची योग्य निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
शेवटी, योग्य संगत ही आपल्या जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. अशा लोकांच्या सहवासात राहणे म्हणजे यशस्वी आणि आनंदी जीवनाकडे टाकलेले एक महत्त्वाचे खात्रीशीर पाऊल होय!
आपणही ठरवूया.... चांगले आयोजक, योग्य मॕनेजमेंट, योग्य बोलणं, योग्य सन्मान, समजून घेण्याची योग्यता/परिपक्वता असणे, व्यावसायिक निर्णय क्षमता, योग्य कृतीशीलता, अशा सकारात्मक व्यक्तींची संगत निवडूया, स्वतःला घडवूया आणि इतरांनाही सोबत घेऊन 🏆 यशाच्या दिशेने निश्चित सुयोग्य वाटचाल करूया ✨*
स्नेहांकित,
अमित गोडबोले
आयोजक - श्री सखी
BRAND AND GRAND EXHIBITION ORGANISATION