Anil Decorators And Caterers

Anil Decorators And Caterers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anil Decorators And Caterers, Event Planner, Mumbai.

14/04/2023
11/04/2023

कोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..

हृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे..

1) परप्रांतीय वाढतील.
2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल.
3) केमिकल झोन कोकणभर पसरेल.
4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.
५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.

6) चकचकीत इमारती उभ्या राहतील. परिसरातील दुकाने जैन- मारवाड्यांचीच असतील. शिपाई, माळी, सफाई कर्मचारी आदी वर्ग स्थानिक असेल.
7) एमप्लॉयीज च्या कोलोनीत स्थानिक कुणबी स्त्रिया भांडी, कपडे आदी घरकामाला असतील.

8 ) वातावरणात कार्बन, सल्फरचे प्रमाण वाढून परिसरातील बागायतींवर वाईट परिणाम होतील. श्वसन आदी विकार वाढीस लागतील.
9)प्रकल्पाचे एक्सपानशन होतच राहील.

10) रात्री रिफाईनरी च्या पाइपांचे आणि इमारतींचे झगमगाट डोळे फाडून खातील, नीरव शांतता जाऊन यंत्रांचा घनघणाट कान फोडून टाकेल.
11) शहरी संस्कृती वाढून नैसर्गिक जीवन संपेल.
12) विस्थपित ग्रामस्थ मुंबईतील खुरड्यात राहतील.
13) गणेशोत्सव, शिमगा, राखण , जत्रा, मंदिरांचे वार्षिक उत्सव आदी सगळं संपलेलं असेल.
म्हणजेच, स्थानिक प्रकल्पग्रस्त उपरे झालेले असतील, मुळापासून उखडून फेकलेले लाचार आणि दिनवाणे.
14) काही राजकारणी कंत्राट मिळवून गब्बर होतील, दादागिरीही करत असतील, तरुण ग्रामीण मुले त्यांची लोम्बते बनण्यात धन्य असतील.
15) परिसरातील गावे प्रकल्पाच्या फंडावर डोळा ठेऊन असतील.आपापसात गट-तट निर्माण होतील.
16)आंबा-काजू-कोकम, माङ आदी उत्पन्नाची साधने नसतील, नुसते नावालाच असतील.
17) सिल्वासा मध्ये आदिवासींचे म्युसिअम आहे, तसेच कोकणी जीवनाचे प्रदर्शन CSR फंडातून कंपनी मांडेल.

18) परिसरातील तापमान वाढेल, मॉल येतील, मल्टिप्लेक्स येतील, हाई-फाय हॉटेल्स, रेस्टॉरंट येतील, आपली जनता रस्त्यावरून जाताना अंग चोरत राहील.
असूयेने श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन बघत राहतील.
19) गिर्ये येथून दिसणारा निळाशार अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि मच्छिमार बोटीच्या उभ्या राहण्याने बनणारे विहंगम दृश्य इतिहास जमा होईल.
तेलवाहू महाकाय जहाज , पसरलेले तेलाचे तवंग, गिर्येच्या सड्यावर उभ्या असलेल्या महाकाय राक्षसी टाक्या, तेथून नणारपर्यंत येणाऱ्या पाईप आणि त्यावर लिहिली असणारी राजकीय प्रचाराची चुन्याने लिहिलेली वाक्ये डोकं पोखरून काढत असतील.
20) किनाऱ्यावरील शिंपले, कालव, कुऱल्या इतिहासात जमा होतील.
छोटे मच्छिमार कनिष्ठ कामगार होतील.
काळपटलेल्या खाडी किनारी त्यांच्या सडलेल्या बोटी भयाण वाटत हेलकावे खात असतील.
21) मच्छिमार समाज देशोधडीला लागला असेल. त्यांची गावे ओस पडली असतील.
22) कितीही लांबून दिसणारी, मोठ्या उंच चिमणीतुन बाहेर येऊन वखवखलेला मोठाला आगीचा लोळ 24 तास जळत असेल, आकाश काळपटवून टाकत असेल आणि कोकणच्या नशिबावर क्रूर हास्य करीत असेल.
एकूण, कोकण आपण गमावलेले असेल,
तेही कायमचे!
पुन्हा ते गावपण, आपल्या लाल मातीच प्रेम आठवणीत घेऊन कुंथत सध्याची पिढी प्राण सोडेल.
नवीन पिढी आपल्या गावाविषयी पूर्ण अनभिज्ञ असेल...

एक होते कोकण..सुंदर, हिरवेगार,सुशेगाद, कडू-गोड माणसांचे...
एक दंतकथा बनून राहील..

फक्त वाचू नका. कोकण वाचवा😟😟

साभार Dm

09/04/2023
06/03/2023
06/03/2023
04/03/2023

Address

Mumbai
400089

Telephone

+919892360003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anil Decorators And Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category