19/08/2026
आजची भेट… एक प्रेरणादायी अनुभव! 🙏
सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे सर यांनी आज क्लबला भेट देऊन उद्योजकांसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
“मराठी उद्योजक मोठा कसा होतो? तो कुठे चुकतो? आणि सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर त्याला काय फायदा होतो?” या विषयावर सरांनी आपल्या अनुभवातून दिलेले मार्गदर्शन प्रत्येक उद्योजकासाठी विचार करायला लावणारे आणि प्रेरणादायी होते.
उद्योजक म्हणून मोठं होण्यासाठी योग्य नेटवर्किंग, योग्य मार्गदर्शन, परस्पर सहकार्य आणि व्यावसायिक संधी किती महत्त्वाच्या आहेत, हे आज सरांच्या मार्गदर्शनातून पुन्हा एकदा जाणवले.
सरांनी आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता आणि आभार! 🙏
आपल्या अनुभवातून मिळालेली दिशा आणि प्रेरणा निश्चितच आमच्या व्यावसायिक प्रवासात उपयोगी ठरेल.
आपला व्यवसाय वाढवा…
योग्य नेटवर्किंग करा…
आणि सॅटर्डे क्लबसोबत पुढे चला! 🚀
Saturday Club 🤝
Connect • Learn • Grow