फ्री हिट - Free Hit

Call Directions

फ्री हिट  - Free Hit Free Hit

02/05/2026

परमार्थाचा 'हिशोब'

मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताला आपलेसे करून घेण्यासाठी पूर्वीच्या काळी ऋषी- मुनी तपश्चर्या करत असत.त्यासाठी एकांतात राहत.संसारसुखाचा, ऐश्वर्याचा त्याग करत जंगलात निघून जात. ईश्वर एकांतातच भेटतो हे त्यांना माहिती होतं.ईश्वराला केवळ भक्तीभाव लागतो, त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी दुसरं काहीही लागत नाही हे त्यांना कळलेलं होतं. म्हणूनच सर्वस्वाचा त्याग करून ते आपले आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित करत असत.ना कुठलं साहित्य, ना दिखावा, ना ऐश्वर्याची जाहिरात.
हा झाला इतिहास. पण वर्तमानात भक्ती हा दाखवण्याचा, मोठेपणाचा विषय झालाय. एकांतात, विरक्तीने नव्हे तर मोठेपणा, बडेजाव दाखवण्याचा मार्ग बनलाय. संतांनी एकांतात भक्ती केली पण आता साऱ्या गावाला जागवून भक्तीचे प्रदर्शन केले जातेय. संतांना अंगावरील वस्त्राचेही भान नव्हते ना खाण्यापिण्याची काळजी. त्यांना भौतिक सुविधा लागतंच नव्हत्या.
आता मात्र काय लागत नाही ? भक्तीसाठी केल्या जाणाऱ्या सप्ताहात महाराजांना उंची वस्त्र लागतात. भारी गाडी असल्याशिवाय महाराज येत नाहीत. मग त्यासाठी देणगी मागावी लागते. आणि इथेच भक्तिमार्गाला दुषणे दिली जातात.
देणगी देणारा कधीही हात आखडता घेत नाही. हीच बाब काही जणांच्या पथ्यावर पडतेय.
काही दिवसांपूर्वी झालेल्या सप्ताहातील प्रकार असाच आहे.
जमा झालेली देणगी पाहून संबंधित व्यक्तीचे डोळे फिरले आणि त्याने हात मारला.विशेष म्हणजे व्यासपीठावरून परमार्थाच्या बाता मारणाऱ्या महाराजानेच देणगीचा हिशोब दिला नसल्याची तक्रार झालीय. पोलिसांनी तक्रारकर्ते आणि ज्याच्यावर आरोप झालेत त्या दोघांनाही हिशोब देण्यासाठी बोलावलंय. तिथे काय झालं आणि होईल हे माहित नाही.
एक मात्र खरंय, जन्माला येणाऱ्या माणसाच्या प्रत्येक कर्माची नोंद चित्रगुप्त ठेवतो असे म्हणतात. महाराज कीर्तनात हे सांगतात. मृत्यूनंतर यमराजासमोर या सर्व कर्म आणि कारनाम्यांचा हिशोब होतो असंही सांगितलं जातं.
या महाराजांना किमान तिथं तरी हिशोब द्यावाच लागेल.
लोकांना सांगता सांगता एवढं जरी या महाराजांना कळलं असतं तरी कल्याण झालं असतं.

बैठक : आढाव्यासाठी की अडवण्यासाठी ? लातूर शहरच्या आमदारांनी नुकतीच महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. ही बैठक होती की कार्य...
30/04/2026

बैठक : आढाव्यासाठी की अडवण्यासाठी ?

लातूर शहरच्या आमदारांनी नुकतीच महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. ही बैठक होती की कार्यशाळा? असा प्रश्न पडावा कारण सुमारे साडेपाच तास ही बैठक चालल्याचे सांगितले गेले.
आमदारांनी बैठका घेण्यात गैर काहीच नाही पण त्या बैठकीचे 'मुहूर्त' पाहता अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'किरकोळ' विषयात आमदार बहुधा लक्ष घालत नाहीत. पण महानगरपालिकेच्या विषयात मात्र त्यांनी तब्बल साडेपाच तास खर्ची घातले. एरवी सामान्य नागरिक, मतदार आणि अधिकाऱ्यांसह मान्यवर नेत्यांनाही ताटकळत बसवणाऱ्या आमदारांनी शहरातील प्रश्नासाठी जवळपास अर्धा दिवस दिला, याचे आश्चर्य वाटते.
नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते. त्यामुळे आढावा बैठक घेण्यात गैर काहीही नाही. मागेही मनपात प्रशासकराज असताना त्यांनी अशीच बैठक घेतली होती. त्या बैठकीचे फलित काय ? हे मात्र आजवर स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या बैठकीचे फलित केंव्हा दिसणार ? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
महानगरपालिका सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे त्यांनीच निवडलेले महापौर व उपमहापौर कार्यरत आहेत. नियमित कामकाज सुरू आहे. असे असताना आढावा बैठक घेऊन प्रशासनाला 'खडेबोल' सुनावल्याचे सांगणे म्हणजे आपलेच पदाधिकारी काम करत नसल्याची कबुली देण्यासारखे आहे. महापौर व उपमहापौर काहीच काम करत नाहीत, मनपात जे काही चालते ते माझ्यामुळेच,किंबहुना जी कामे होतात ती मीच करवून घेतो,असे दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
लातूरचे आमदार ज्येष्ठ नेते आहेत. विधिमंडळात पक्षाचे प्रतोद अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते सतत 'बिझी' असतात.विधिमंडळ कामकाजाच्या व पक्षातील जबाबदारीच्या निमित्ताने सतत व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना लातूरकडे येण्यास फारसा वेळही मिळत नाही. असे असताना त्यांनी एका आढावा बैठकीसाठी तब्बल साडेपाच तास वेळ दिला, हे महत्त्वाचे आहे. कदाचित मुंबईतील कामकाजातून सवड मिळाली असावी किंवा तेथे फारसे काम नसावे म्हणूनच त्यांनी इथे एवढा वेळ दिला असावा, असेही बोलले जाऊ लागले आहे.
एकाच बैठकीत आमदार महोदयांनी झाडून सर्व विषयांचा आढावा घेतला. सर्व विषय मार्गी लावले. तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्या. त्यामुळे लातूरकरांना आता हायसे वाटले असणार. आपल्या समस्या लगोलग सुटतील, याची ते वाट पाहत असणार. कारण आपल्या नेत्याच्या शब्दावर त्यांना ठाम विश्वास आहे. म्हणूनच अजूनही उजनीच्या पाण्यासाठी लातूरकरांच्या नळ्याच्या तोट्या खुल्या आहेत.
नवीन पदाधिकाऱ्यांना पदभार घेऊन फार थोडा काळ लोटला आहे. त्यांच्या परीने त्यांनी कामही सुरू केले आहे. अशा स्थितीत सर्वसाधारण सभेच्या पूर्व दिवशी आढावा बैठक घेऊन नेत्यांनी इथे आपलीच सत्ता चालते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी ज्यांना पदावर बसवले होते त्यांनाही सोबत घेत हा आढावा घेण्यात आला.
नव्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामकाज सुरू केले होते. रस्त्यावर उतरून शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. महापौर व उपमहापौरांच्या या प्रयत्नाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियात त्याचे मोठे कौतुकही झाले होते. नागरिकांचा हा प्रतिसाद पाहूनच पदाधिकाऱ्यांची लोकप्रियता अधिक वाढू नये, या हेतूने 'कर्ता- करविता' मीच आहे, हे दाखवून देण्यासाठी बहुधा आढावा बैठक घेतली गेली असावी, अशी चर्चा मनपाच्या आवारात होते आहे.
काही का असेना, शहरातील समस्या आमदारांच्या कानी गेल्या, हेच या बैठकीचे फलित म्हणावे लागेल.

अर्चनाताईना 'संचित' कमी पडलं...  जन्माला येताना प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन येतो.त्यानुसार आयुष्यात त्याला सारं काही मिळतं...
29/04/2026

अर्चनाताईना 'संचित' कमी पडलं...

जन्माला येताना प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन येतो.त्यानुसार आयुष्यात त्याला सारं काही मिळतं असं म्हणतात. राजकीय जीवनातही 'संचित' निर्माण करावं लागतं. समाजासाठी, पक्षासाठी झिजावं लागतं. काम करावं लागतं.
नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम केलं तर पक्ष मोठा होतो.मग या नेते व कार्यकर्त्यांना 'अच्छे दिन' दिसू लागतात.योग्य वेळी निष्ठेचा व केलेल्या कार्याचा पक्षाकडून सन्मान होतो.
आजच्या राजकीय वातावरणात विविध निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यावरून कार्यकर्ते व नेत्यांची उपयुक्तता जोखली जाते. भविष्यातील निवडणुकांत किती उपयोग होईल? हे पाहून निवडणुकांमध्ये उमेदवारांना संधी दिली जाते.
या अनुषंगाने लातूरच्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना न मिळालेल्या संधीचा विचार करणे आवश्यक आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी भाजपात आलेल्या अर्चनाताई यांच्या पाठीमागे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नावाची पुण्याई निश्चितच आहे.पण भाजपात ताईनी असं काय करून दाखवलं? की त्यांना विधान परिषदेवर घ्यावं? ताईंना पक्षाने विधानसभा लढवण्याची संधी दिली होती.अनेक चेहरे बाजूला सारत पक्षात नवख्या असणाऱ्या अर्चनाताईंना तिकीट दिलं गेलं. पण त्या विजय मिळवू शकल्या नाहीत. पराभूतांना उमेदवारी न देण्याचे धोरण बहुधा भाजपाने ठरवले होते. एकंदर उमेदवारांची यादी पाहता पक्षासाठी झिजलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याचे दिसून येते. अपवाद फक्त प्रज्ञा सातव यांचा. त्यांनाही काँग्रेसकडून संधी मिळाल्यानंतर भाजपात येताना ज्या आमदारकीचा राजीनामा दिला त्याचाच उर्वरित कालावधी मिळणार आहे.
अर्चनाताईंचा विचार करता पक्षासाठी केलेल्या कार्याचे संचित कमी पडल्याचे सांगितले जाते. लोकसभेत ताईंनी भाजपाचा प्रचार केला. तिथे पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. विधानसभेला त्या स्वतः पराभूत झाल्या. महानगरपालिका निवडणुकीत प्रभारी पद काढून घेतल्याने रुसलेल्या ताईंनी झोकुन देत प्रचार केला नसल्याची तक्रार कार्यकर्तेच खाजगीत करतात. या सर्व बाबी वरिष्ठांच्या कानावर गेलेल्या असतीलच.

जाता जाता....
लिंगायत म्हणून डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना संधी द्यावी, अशी बॅनरबाजी उमरगा येथे झाली होती. ही बाबही वरिष्ठांना समजली असणारच..

विनायकराव पाटलांचा नवा 'घरोबा'  माजी मंत्री आणि अहमदपूर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार विनायकराव जाधव पाट...
28/04/2026

विनायकराव पाटलांचा नवा 'घरोबा'

माजी मंत्री आणि अहमदपूर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार विनायकराव जाधव पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटाशी नवा घरोबा केलाय. खरंतर अपक्ष हीच विनायकरावांची खरी ओळख. 1999 आणि 2014 च्या मोदी लाटेतही अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विनायकरावांना पहिल्याच टर्ममध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती. नंतर मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी असा प्रवास करून पाहिला पण राजकीय पक्षाकडून आमदारकी त्यांच्या नशिबातच नसावी.
आमदारकीसाठी विनायकरांनी पक्षही बदलून पाहिले पण त्यांना विधानसभेचा रस्ता सापडला नाही. आता पुन्हा एकदा त्यांनी नवी वाट चोखाळली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.सध्या विधानसभेची निवडणूक नाही. विधान परिषदेत शिंदेंच्या वाट्याला एकच जागा येणार असून ती जागा विनायकराव पाटलांना देण्याएवढे त्यांचे ' भव्य दिव्य' कर्तृत्वही नाही. असे असताना विनायकरावांनी धनुष्याची दोरी का ताणली असेल? हाच खरा प्रश्न आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ते जिल्हाध्यक्ष होते.लातुरात तुतारी फारशी वाजतही नाही.कदाचित सत्तेच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न असावा. पण एवढे करूनही विनायकरावांना कुठे संधी मिळेल असे दिसत नाही. उलट मतदारसंघातील त्यांच्या प्रतिमेला या प्रवेशाने धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
पाटलांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना 25 हजार कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा वायदा केलाय. हा वायदा खरा ठरतो का? हे पाहणे आता औत्सुक्याचे असेल.

25/04/2026

'आप' यहाँ आये किस लिये ?

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील 7 खासदारांनी भाजपा मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. कोणी याला ऑपरेशन 'लोटस' म्हटलं तर कोणी चौकशीचा ससेमिरा मागे असल्याने खासदार भाजपात आल्याचं सांगितलं. पण 7 पैकी केवळ एकाच्या मागे चौकशीचा ससेमिरा होता. एकाला अपमानित करण्यात आले होते.
ऑपरेशन लोटस म्हणावं तर तशा हालचाली कुठे दिसत नव्हता. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. कर्नाटक मध्येही दबक्या आवाजात कसली तरी चर्चा सुरू होती. पण आप विषयी फारसं कोणी काही बोलत नव्हतं.
दुसरीकडे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सारे चाणक्य बंगालमध्ये गुंतलेले होते.आम आदमी पक्षाची कुठे चर्चाही होत नव्हती. त्यामुळेच ही फूट अथवा विलीनीकरण नेमके कुठल्या कारणाने झाले ? हे यथावकाश समोर येईलच.
आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठी या खासदारांनी भाजपाला जवळ केलेलं असू शकतं. राज्यसभेत पुन्हा संधी मिळावी हा देखील अंतस्थ हेतू असावा. भाजपला मात्र याचा निश्चितपणे फायदा होणार आहे.
बंगालच्या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवताना 10 महिन्यानंतर होणाऱ्या पंजाबच्या निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली असल्याचं यातून दिसून आलं. याचा किती फायदा होतो? ते आगामी काळात दिसून येईलच...

24/04/2026

खासदारांनी आपला 'झाडू'न काढलं..
बल्ले बल्ले.....

अर्चनाताईंना संधी! पण.... विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नावाची चर्चा होतेय.त्या ...
23/04/2026

अर्चनाताईंना संधी! पण....

विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नावाची चर्चा होतेय.त्या आमदार होतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे.पण... हा पणच काय करील ? याचा नेम नाही.
मुळात विधानसभेला पराभूत झालेल्याना पक्ष संधी देईल का? हा पहिला प्रश्न. त्यात ताई 'एकलकोंड्या' स्वभावाच्या.त्यांची शिफारस कोण करणार ? निवडणुकीत पाठबळ देणारे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर आज सोबत दिसत नाहीत.आ. अभिमन्यु पवारांचं काहीतरी वेगळंच असतं.रमेश कराड तर ग्रामीणचे आमदार. त्यांचा आणि शहराचा संबंधच नसतो. तसा ताईनी तरी कधी कुणाशी ठेवलाय? जिल्ह्यात त्यांचं काम तरी किती? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
हां... भाजपाचं सध्याचं महिला धोरण हा ताईना एकमेव आधार असू शकतो.दुसरा चाकूरकर नावाचा फायदा.. पण त्याचा अनुभव विधानसभेला आलेलाच आहे.त्यामुळं ताईना संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.

Address

Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919206631111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when फ्री हिट - Free Hit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share