Saptaphere Matrimony

Saptaphere Matrimony India's largest online matrimony service. Leading all Community matrimonial Website and app. Trusted And Secure Matrimonial Site & App . No Fake Profiles.

Easy Search option. 100% Verified Contact Details.

09/08/2026

आज छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित लोकशाही मराठी न्यूज चॅनेलतर्फे सप्तफेरे विवाह संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. संजय नागनाथ राजुळे यांना “सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. 💐🏆

मा. मंत्री अतुल सावे, मा. आमदार प्रशांत बंब, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्याला मिळालेला हा सन्मान म्हणजे सप्तफेरेच्या सामाजिक वाटचालीतील गौरवशाली आणि अविस्मरणीय क्षण! ❤️🙏

08/08/2026

सुरज शिवाजीराव माने (रा. लिंबाळा, ता. निलंगा, जि. लातूर) व सुकन्या संतोष सूर्यवंशी (रा. शेळगी, ता. निलंगा, जि. लातूर) यांचा साक्षगंध सोहळा विश्व पॅलेस, रिंग रोड, लातूर येथे आनंदी वातावरणात संपन्न झाला.

💐 नवदांपत्य सुरज व सुकन्या तसेच माने आणि सूर्यवंशी परिवारांना भावी आयुष्यासाठी सप्तफेरे विवाह संस्थेच्या परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

सप्तफेरे विवाह संस्था – विश्वासाचे १३ वर्षे...
📞 7066685555 | 7066644646
🌐 www.saptaphere.com

02/08/2026
19/07/2026

नमस्कार!
रतनकुमार निळकंठ गायकवाड (रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर) आणि अर्पिता अरुण जाधव (रा. रौळसगाव, जि. बीड) यांचा साखरपुडा सोहळा आज, १९ जुलै २०२६ रोजी हॉटेल वैष्णव, डी-मार्ट रोड, लातूर येथे आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

हा विवाह सप्तफेरे विवाह संस्थेच्या मध्यस्थी सेवेमार्फत जुळून आला. दोन्ही परिवारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, आम्ही सुचवलेल्या स्थळाला दिलेली सकारात्मक पसंती आणि परस्पर समजुतीतून घेतलेला निर्णय, हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे.

या मंगल सोहळ्यास सप्तफेरे विवाह संस्थेचे संस्थापक संजय राजुळे, सहकारी मनीषा पांचाळ आणि संपादक दत्तात्रय परळकर उपस्थित राहून नवदांपत्याला शुभाशीर्वाद दिले तसेच दोन्ही परिवारांचे अभिनंदन केले. यावेळी गायकवाड आणि जाधव परिवारांनी सप्तफेरे विवाह संस्थेच्या मध्यस्थी सेवेबद्दल मनीषा मॅडम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.

💐 रतनकुमार व अर्पिता तसेच गायकवाड आणि जाधव परिवारांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
📞 7066685555 | 7066644646
🌐 www.saptaphere.com

16/07/2026

अभिलाष शंकर हिंगाणे (रा. बारामती) आणि राजलक्ष्मी अमर बिरादार (रा. सोलापूर) यांचा साक्षगंध सोहळा ११ जुलै २०२६ रोजी तथास्तु बँक्वेट, बारामती येथे आनंदी वातावरणात संपन्न झाला. हा विवाह सप्तफेरे विवाह संस्थेच्या मध्यस्थी सेवेमधून जुळून आला, याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान आहे.

दोन्ही परिवारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, आम्हाला योग्य स्थळ सुचवण्याची दिलेली संधी आणि त्या स्थळाला दोन्ही बाजूंनी दिलेली पसंती... हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे. दोन सुंदर कुटुंबांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.

साक्षगंध सोहळ्यासाठी दोन्ही परिवारांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहता आले नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लग्न समारंभाला नक्की उपस्थित राहण्याचा आमचा प्रयत्न असेल.

💐 अभिलाष व राजलक्ष्मी तसेच हिंगाणे आणि बिरादार परिवारांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

सप्तफेरे विवाह संस्था – १३ वर्षांची विश्वासाची परंपरा...
📞 7066664664 | 7066334646
🌐 www.saptaphere.com

16/07/2026

नमस्कार!
नामदेव बापूराव मोरे (रा. नायगाव, ता. चाकूर, जि. लातूर) आणि सृष्टी सतीशराव जाधव (रा. लातूर) यांचा साक्षगंध सोहळा आज, १५ जुलै २०२६ रोजी संस्कृती मंगल कार्यालय, अहमदपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

हा विवाह सप्तफेरे विवाह संस्थेच्या मध्यस्थी सेवेमार्फत जुळून आला. दोन्ही परिवारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि आम्ही सुचवलेल्या स्थळाला दिलेली पसंती यामुळे हे सुंदर नाते जुळले, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे.

या सोहळ्यास सप्तफेरे विवाह संस्थेचे संस्थापक तथा समाजसेवक संजय राजुळे उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या राजुळे सरांनी "प्लास्टिकला नकार... कापडी पिशवीचा स्वीकार" हा संदेश देत उपस्थित मान्यवरांना नवदांपत्याच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप केले.

25/06/2026

प्रमोद उमाकांत कोनाळे पाटील (रा. सावरगाव, ता. देवणी, जि. लातूर, ह.मु. उदगीर) व ऋतुजा दीपक साखरे (रा. भिसे वाघोली, ता. जि. लातूर, ह.मु. नाशिक) यांचा शुभ विवाह सोहळा आज दिनांक २४ जून २०२६ रोजी गजराज पॅलेस, खाडगाव रिंग रोड, लातूर येथे उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

या विवाहसोहळ्यास सप्तफेरे विवाह संस्थेचे संचालक श्री. माधव तरगुडे तसेच सहकारी सौ. अंजली पाटील व सौ. मनीषा पांचाळ मॅडम उपस्थित होत्या. यावेळी नवविवाहित वधू-वरांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

हा विवाह सप्तफेरे विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळून आलेला असून, दोन्ही कुटुंबीयांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विशेषतः साखरे कुटुंबाकडून मिळालेला अभिप्राय अत्यंत भावनिक व प्रेरणादायी होता. त्यांच्या अपेक्षांनुसार योग्य जोडीदार शोधून देण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि त्यांना मनासारखे स्थळ मिळाल्याचे समाधान त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाले. हेच आमच्या कार्याची खरी पावती आहे.

प्रत्येक यशस्वी विवाहामागे फक्त दोन व्यक्ती नव्हे, तर दोन कुटुंबांचे स्वप्न, विश्वास आणि आनंद दडलेला असतो. त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू.

💐 प्रमोद आणि ऋतुजा यांना सुखी, समृद्ध, आनंदी आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

✨ सप्तफेरे विवाह संस्था महाराष्ट्र ✨
स्थळ | भेट | विवाह

24/06/2026

रोहित दिलीप शेटे (रा. लातूर) व पूजा महादेव पावडशेट्टी (रा. डाळिंब, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांचा शुभ विवाह सोहळा आज दिनांक २४ जून २०२६ रोजी ओम लॉन्स, सावेवाडी, लातूर येथे उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

या विवाहसोहळ्यास सप्तफेरे विवाह संस्थेचे संचालक श्री. माधव तरगुडे तसेच सहकारी सौ. अंजली पाटील व सौ. मनीषा पांचाळ मॅडम उपस्थित होत्या. यावेळी नवविवाहित वधू-वरांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

हा विवाह सप्तफेरे विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळून आलेला असून, दोन्ही कुटुंबीयांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कुटुंबांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आम्हाला अनेक सुखी संसार घडविण्याची संधी मिळत आहे.

💐 रोहित आणि पूजा यांना सुखी, समृद्ध, आनंदी व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

✨ सप्तफेरे विवाह संस्था महाराष्ट्र ✨
स्थळ | भेट | विवाह

सप्तफेरे विवाह संस्थेचे संस्थापक, समाजसेवक, दूरदर्शी नेतृत्व लाभलेले व्यक्तिमत्त्व आणि असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात आनंद...
10/06/2026

सप्तफेरे विवाह संस्थेचे संस्थापक, समाजसेवक, दूरदर्शी नेतृत्व लाभलेले व्यक्तिमत्त्व आणि असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे प्रेरणास्थान आदरणीय संजय नागनाथ राजुळे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे सप्तफेरे विवाह संस्था आज संपूर्ण महाराष्ट्रात विश्वास, पारदर्शकता आणि यशस्वी विवाहबंधनासाठी ओळखली जाते. आपल्या मार्गदर्शनाखाली हजारो वधू-वरांना सुयोग्य जीवनसाथी मिळाले असून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि नव्या नात्यांची सुंदर सुरुवात झाली आहे.

विवाह क्षेत्रातील कार्यासोबतच आपण समाजसेवेचा वसा जपत रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती जनजागृती, आरोग्यविषयक जनजागृती, वृक्षारोपण व वृक्षवाटप, दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदत, तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारे पुरस्कार सोहळे यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहात. समाजहित आणि लोककल्याणासाठी असलेली आपली तळमळ खरोखरच प्रेरणादायी आहे.

आपली कार्यक्षमता, सकारात्मक विचारसरणी, अफाट ऊर्जा, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेली निष्ठा ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वाखाली सप्तफेरे विवाह संस्था आणि आपल्या सर्व सामाजिक उपक्रमांची यशोगाथा अधिकाधिक विस्तारत राहो, हीच सदिच्छा.

ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि अखंड यश प्रदान करो. आपल्या हातून असेच समाजोपयोगी व लोककल्याणकारी कार्य निरंतर घडत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.🙏🏻

📰 सप्तफेरे परिवारासाठी अभिमानाची बाब! 🏆💐राज्यस्तरीय “सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सप्तफेरे विवाह संस्...
27/05/2026

📰 सप्तफेरे परिवारासाठी अभिमानाची बाब! 🏆💐

राज्यस्तरीय “सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सप्तफेरे विवाह संस्थेचे संस्थापक श्री. संजय राजुळे यांच्या कार्याची दखल घेत अनेक नामांकित वृत्तपत्रांनी विशेष प्रसिद्धी दिली आहे. 🌟

समाजसेवा, विवाह जुळवणी व सेवाभावी कार्याचा हा गौरव म्हणजे संपूर्ण सप्तफेरे परिवारासाठी प्रेरणादायी क्षण आहे. 🙏❤️

आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच हा प्रवास अधिक भक्कम होत आहे. ✨

SocialWork NewsCoverage

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saptaphere Matrimony posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saptaphere Matrimony:

Shortcuts

Share