09/10/2024
अर्चना मल्टीपर्पज हॉल वाकरे फाटा येथे गेले दोन दिवस, ‘बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने’ बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा उपक्रम घेतला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात इमारत व बांधकाम मंडळात नोंदणीकृत जीवित कामगार यांना ‘गृहपयोगी वस्तू संच वितरण’ करण्यात येणार आहे. या नोंदीत बांधकाम कामगारांना येत्याकाळात विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येणार आहे.
बांधकाम कामगारांना संबंधित काम पूर्णत्वास झाल्यावर, रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने राहण्याची व्यवस्था, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन जेवण तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून, कामगार कल्याणकारी मंडळाने दहा लाख बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. कामगारांचे जीवनमान सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या नोंदणी साठी मोठ्या संख्येनं करवीर तालुक्यातील बांधकाम कामगारांची उपस्थिती होती. हि अपेक्षित संख्या पाहूनच मा. सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी व सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी अर्चना मल्टिपर्पज हॉल ची निवड केली. एकतर कोल्हापूर पासून अर्चना हॉल दहाच मिनिटांच्या अंतरावर आहे. मुख्य रस्त्यालगत असल्याने सर्वांना सोयीचा देखील आहे. येथे प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे. गर्दीवर नियंत्रण होण्यासाठी प्रेवशासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने पाऊस आल्यास इतक्या गर्दीस सामावून घेणायची मोठी क्षमता देखील आहे.
लग्नसमारंभ, साखपुडा, कॉन्फरन्स व सेमिनारसाठी बरोबरच अशा वेगळ्या कारणासाठी अर्चना हॉल उपयुक्त आहे. सार्वजनिक उपक्रमांसाठी उपयुक्तता अर्चना हॉल ने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
"तुमच्या पुढच्या समारंभासाठी बुकिंग करा आत्ताच!
अर्चना मल्टीपर्पज हॉल
‘तुमच्या आनंदी प्रसंगांचा सोबती ’
‘सतसात्विक फूड्स प्रा. लि., कोल्हापूर’
यांचे व्यवस्थापन
अजित तांबेकर 9881129249
सागर बकरे 7741091224
सारिका बकरे 9130365036
अधिक माहितीसाठी / बुकिंग/ चौकशी
78208 75924