
12/04/2025
आज (चैत्र पौर्णिमा- १२ एप्रिल) श्री जोतिबा देवाची यात्रा...
आज चैत्र पौर्णिमा... असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस... पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील डोंगर श्री जोतिबाच्या वास्तव्याने पुनित झाला आहे.
जोतिबा हे बद्रिकेदारचेच रूप आहे. वास्तविक जोतिबा यात्रेचा मुख्य हेतू म्हणजे देवी यमाई (रेणुका) आणि महर्षी जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा आनंद सोहळा... या यात्रेसाठी लाखो भाविक जोतिबा डोंगर येथे येतात.
आजच्या मुख्य दिवशी पहाटे श्री जोतिबा देवास शासकीय महाअभिषेक होतो. सकाळी देवाची षोडशोपचार पूजा केली जाते. दुपारी दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेस प्रारंभ होतो. सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आरती होऊन देवाची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते. सातच्या सुमारास यमाई मंदिरासमोर सदरेवर ही पालखी विराजमान होते. यानंतर जगदग्नीचे स्वरूप-कट्यारीसोबत श्री यमाईदेवीचा विवाह सोहळा होतो. यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणेनंतर पालखी सदरेवर विराजमान होते.
भक्तवत्सल श्री जोतिबा देवास भक्तिपूर्वक प्रणाम... जोतिबाच्या नावानं चांगभलं... भाविकांचे हार्दिक स्वागत...
#श्रीजोतिबा #श्रीकेदारनाथ #श्रीयमाई #चैत्र यात्रा