
20/05/2025
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज पुण्यात दुःखद निधन झाले. २०१३ साली आमच्या सीबीडी फाऊंडेशनच्या “महाराष्ट्राचे मानकरी” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने हजेरी लावून त्यांनी आमच्या या कार्यक्रमाची शान वाढवली होती. त्यानिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी आम्हाला म्हणजे मी, दिलीप चावरे आणि कै. प्रदीप भिडे यांना लाभली होती. त्यांच्या सहवासातील ते काही क्षण म्हणजे आमच्यासाठी अक्षरशः सुवर्णक्षण होते. डॉ. जयंत नारळीकरांना भावपूर्ण श्रध्दांजली !!