06/09/2026
आज दिनांक 5 सप्टेंबर, 2026 शिक्षक दिनानिमित्त ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे,व अध्यक्ष म्हणून Adv.श्री विलास खरात सर (धर्मदाय आयुक्त यांचे कार्यालय), देवगिरी ट्रेकर्स चे अध्यक्ष प्राध्यापक श्री. चंद्रकांत जी गायकवाड सर, तसेच ग्लोबल ह्यूमन राईट ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच राष्ट्रीय अध्यक्ष (लाचलुचपत विभाग) डॉ.श्री. विनायक सरवदे सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . शिक्षण उपाध्यक्ष, ग्लोबल हुमान राईट ट्रस्ट. सौ.ममता हिवाळे यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षकां चा गुणगौरव म्हणून त्यांना शाल , बुके, व ग्लोबल ह्यूमन राईट ट्रस्ट तर्फे प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ...सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे. श्री कटारे सर, श्री .चंद्रकांत जी गायकवाड सर ,(अध्यक्ष देवगिरी ट्रेकर्स) सुरज आहेर सर (राज्य कबड्डी सदस्य) व क्रीडाशिक्षक, श्री. मापारी सर, श्री.l नवसागर सर. अध्यक्ष (शिक्षण विभाग) ग्लोबल ह्यूमन राईट ट्रस्ट प्राध्यापक मिलिंद कॉलेज), श्री. चव्हाण सर. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री नवसागर सर यांनी केले.