Wisdom Events and Management

Wisdom Events and Management We are specialist in : Event & Wedding Planning , Event & Wedding Management, Birthday Parties & Personal Parties, Fashion & Award Shows, Product Launch

12/07/2017

नमस्कार मित्रहो मी कनिश्क हिवरेकर आपणा सर्वांकरिता हि एक भयावह आणि अत्यंत रोमांचक कथा घेऊन आलो आहे....कथेच नाव आहे बुजगावण..... कथे मध्ये पात्र जास्त आहेत तरी मित्रहो कथा सुरळीत राहील ...© all rights reserved by kanishk hivarekar

ये माजा वसाड माळा....
खाया चिमण्या पाखर झळझळा
कापितो म्या त्याचं गळ चळचळा..
असा म्या राही उभा मळान
बुजगावन म्हणत्यात मला म्या हाय मराण...
ही...ही...ही....

"च्च्च्र्ररर्र्र्र....चुईइ " आवाज करत त्या दाट धुक्यामध्ये ट्रेन गढदुर्ग स्टेशन वरती येऊन थांबली....
मध्यरात्रीची वेळ झाली होती....ट्रेनचा गजबजलेला तो डब्बा या मुलांनीच बुक केला होता....
सगळे जन मिळून सात आठ जन होते... आणि स्टेशनवर त्यांचा गाईड विजू त्यांच्या येण्याची पाहत उभा होता....
काळोख दाटून आणणारी रातकिड्यांच्या आवाजाने सुन्न करणारी अमौश्याची रात्र होती ती...ट्रेन थांबताच त्या डब्ब्याचा दरवाजा उघडला... स्टेशन तस भकास पडून होत...कुठल्या माणसाची जात दिसत नव्हती त्या स्टेशनवर....

तशी हि सगळीजण आपापले बँगा सामान टाकून गाडीमधून खाली उतरले....पण विष्णू गाडीमधून खाली उतरण्यासाठी तयार होत नव्हता .... कारण..., जेव्हा त्यांचा प्रवास चालू होता तेव्हा त्याच्या जवळच्या सीटवर बसलेला तो वृद्ध माणूस त्याला आठवला ...
जेव्हा यांचा ट्रेन मध्ये दंगा चालू होता तेव्हा त्या वृधाने यांना विचारल होत ...कि .....
"कुठल्या गावाला जातंय पोरानो..." तेव्हा त्याचं दंगामस्ती मध्ये त्या वृद्धाच्या बोलण्याकड लक्ष गेल.... आणि त्यांनी अचानक शांत होऊन खाली बसून त्या गावाचं नाव सांगितल ...कि "आम्ही गडदुर्ग त्या गावाला जातोय ...." तो म्हातारा खिडकी जवळच बसला होता थंडीपासून वाचण्यासाठी त्यान चादर गुंडाळली
होती ...... सहज बाहेरील वातावरणाचा आनंद घेत त्यान यांना विचारल होत ....पण जेव्हा त्या गावाच त्यान नाव ऐकल तस त्याच्या नजरेत बदल आला भुवया ताणल्या गेल्या......पांढरा पडलेला त्याचा चेहरा आणि थरथरती नजर त्याच्याच बाजूला बसलेल्या विष्णूने ते हेरले आणि त्याला विचारल ...© all rights reserved by kanishk hivarekar
"काय झाल काका त्या गावाच नाव ऐकून तुम्ही असे घाबरले का ?" त्यावर प्रथम त्याने टाळाटाळ केली. पण विष्णूने आणि बाकीचानी देखील त्याला प्रश्न विचारून भांबावून सोडले... बाजूच्याच सीटवरती एक कपल बसल होत....
नुकतच लग्न झालेलं दिसत होत त्याचं आणि ते देखील आपल्या हनिमून करिता गडदुर्ग या हिलस्टेशनवर जात होते .. बरेच रम्य ठिकाण होते कोकणामध्ये
त्या पैकीच एक होत हे ....त्या म्हाताऱ्या बुवाने आपली खिडकी बंद केली कारण थंडी हळू हळू जोर पकडत होती .... खिडकी बंद करून त्याने आपल्या अंगावरची चादर घट्ट आवळत घेतली...." " त्यावर प्रज्ञाने आपल्या नाकावरून खाली सरकत असलेला चष्मा वरती केला आणि म्हणाली ....
"हो माहितीये...धराखाडी...."
प्रज्ञा त्या सात जणांपैकीच एक होती....त्यावर तो वृद्ध म्हणाला .... "अर्ध ज्ञान धोकादायक असत पोरे ....झपाटलेली खाडी म्हणतात.... या जागेला..." त्याच्या बोलण्यातील शब्दांना त्याने ठोस आणि कठोरपणा चा आधार दिला .... त्याच्या बोलण्यातच एक चेतावणी एक सूचना अलगद डोकावून बाहेर पडत होती .....
ते ऐकून सगळेजण जागच्या जागी बिथरले... भीतीची एक नाजूकशी लहर सर्वांच्या अंगातून दौडून गेली ....सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोड्या वेळापूर्वी जी दंगामस्ती केलेली मज्जा होती ती आता पूर्ण पणे उतरून गंभीर भावात बदलून गेली होती ....सर्वांच्या चेहऱ्यावर एक भीती रुपी शांतता पसरली गेली होती....तो वृद्ध आता पुढ काय बोलणार होता याच्यावरच सर्वांचे कान आसून राहिले होते....
"झपाटलेली खाडी ...? अस काय आहे ? या ठिकाणी ज्याच्यामुळे या जागेला 'झपाटलेली खाडी' म्हटल जात ...."अजिंक्यने दोन्ही हात हातात गुंतवून कोपरे गुडघ्यावर टेकवत विचारल ... "नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही .. काही गोष्टी असतात च तश्या ज्यांचा पुरावा नसेल तर विश्वास बसत नाही
....मला वाट ...."
"अहो अहो ... थांबा .... सांगून जा आम्हाला .... काय झाल होत इथे ते ...?" त्यावर राहुल म्हणाला .... "हे गाईज .... गुगल मेपवर दाखवत आहे कि .... या ट्रेकचा एंड .... म्हणजे गडदुर्ग आहे ....गडदुर्ग पासून पुढे कुठलेच स्टेशन नाहीये ... आणि त्याच्या अलीकडे देखील कुठलच स्टेशन नाहीये ..." राहुल आपला फोन पाहत म्हणाला ..... त्यालाच दुजोरा देत ... अनिता देखील म्हणाली ... "होय राहुल बरोबर बोलतोय आता कुठलेच स्टेशन येणार नाहीये .... थेट स्टेशन येईल ते म्हणजे गडदुर्गच आहे ..."
त्यावर अजिंक्य त्या वृद्ध माणसाकडे वळला .... "आता कुठलच स्टेशन येत नाहीये तर मग तुम्ही उतरणार कुठे होतात ... कि अस तर नाही ... तुम्ही आमच्या पासून पळून जात आहात .... ?" तो वृद्ध थोडा बावरला ... "आं नाही ... नाही पोरा मी पळून जात नाहीये ... बस चुकून ती गोष्ट निघाली माझ्या तोंडून ...."
"कशी हि असो ... तुम्ही सांगा आम्हाला ... कि काय आहे त्या गडदुर्ग मध्ये ..." विष्णू उद्गारला. .... "त्या गडदुर्ग मध्ये ...;" तो वृद्ध अर्धे वाक्य बोलून थांबला .... आणि त्याने एकवेळ खिडकी मधून बाहेर पाहत म्हणाला ...."मृत्यूचा तांडव होतो त्या जागेत. ...तिथ गेलेला आजवर कोणी जिवंत परत आला नाही .... जर कोणी परतलेच तर तो फक्त मुडदा "
"काय ..... ? मुडदा? " सगळ्यांच्या तोंडून आश्चर्याने शब्द निघू लागले .... त्या बाजूच्या सीटवर बसलेल्या जोडप्यांनी मात्र आपला हात एकमेकांमध्ये घट्ट आवळून धरला ......संध्या,विष्णू,अजिंक्य ,राहुल अनिता...प्रज्ञा आणि अनिश सातीच्या साती जणांनी देखील आपले डोळे आणि कान त्या वृद्धाच्या एक एक बोलल्या जाणार्या वाक्यांकडे होते ... काय रहस्य होत गडदुर्ग बाबतच.... तो पुढे म्हणाला ...
"गडदुर्ग ... झपाटलेला गढ आहे अस म्हणतात ....२० वर्षे झाली तिथ जो कोणी राहयाला वास करायला जाई तो कधीच जिवंत परत येत नाही ... श्राप .. आहे त्या जागेला .... श्राप आहे पोरानो ... आता सुद्धा वेळ आहे परत जा परत जा ....मी सांगतो परत जा ....." सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भीती आणि बरेचसे प्रश्न उद्भवले होते ... पण नवीन पिढीची मुल होती हि यांना अश्या गोष्टींमध्ये थ्रील वाटत होता .. तेवढ्यात वरच्या सीटवरून एक आवाज आला ... "साफ खोटं आहे हे ... अंकल कशाला बच्चे लोग को डरा रहे हो ... छुट्टी पे आये बच्चे ...."
त्याने आपल्या तोंडावर झाकून ठेवलेली टोपी काढली आणि अचानक खाली चाललेल्या संभाषणामध्ये त्याने उडी घेतली ....काही प्रूफ आहे का अंकल .... त्या जागे बद्दलचा ...." त्याने विचारल ... अंगात जाकेट पायात बूट उंचीने थोडा कमी होता तो .. दिसायला एखादा कॉमेडीयन वाटत होता ... परंतु ....बोलण्यात तथ्य मात्र होत त्याच्या ... पुरावा हवा होता ...."
तेव्हा त्या वृद्ध माणसाला अचानक चेव आला आणि त्याने आपल्या अंगावरील चादर काढून बाजूला फेकली ... चादर बाजूला निघताच ... सगळ्यांचे डोळे ते दृश्य पाहून उघडते ते उघडेच राहिले होते ... त्या वृद्धाचा एक हात नव्हता ... आणि त्याच्या अंगावर पाठीवर .. सर्व ठिकाणी नखे ओरबाडलेले व्रण होते ...भयंकर दिसत होत्या त्याच्या जखमा ... तो विचारणारा तो तर दचकून दोन पावले मागेच झाला .... "ह... हे काय .. ? झाल तुमच्या सोबत ...?"
तेव्हा तो व्यक्ती म्हणाला ... " मी आणि माझे काही सहकारी इथे ... रेसोर्ट बांधण्यासाठी आलो होतो.... गावातल्या काही लोकांच्या मदतीन आम्ही रेसोर्ट बांधत होतो ... पण ते रेसोर्ट पूर्ण होई पर्यंत तिथ विचित्र घटना घडू लागल्या ... आम्हाला नकळत आमचे सर्व साथीदार जणू मुंगी चिरडून मेल्यासारखे मरत होते ... ... अश्या मौती कधी आयुष्यात पाहिल्या नव्हत्या मी ...

घृणा आणि भीतीची एक पांढरी छटा त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर सगळ्यांना साफ दिसून येत होती...त्यावर विष्णूने विचारल ..."कोण ...? काय होत ते ? एखाद जनावर होते का? " तो वृद्ध आपला आवंढा गिळत उत्तरला ..."एखाद श्वापद किंवा माणूस असता तर ठीक होत ... पण जर एखादी आत्मा ...."
हा पुढचा धक्का होता त्या मुलांसाठी सर्वांचे चेहरे मुर्त्याप्रमाणे स्तब्ध झाले होते.... एवढे सगळे जन सोबत असताना देखील सर्वांच्या कंठात भीतीचा आवंढा अडकून होता
बस एकच सांगेन पोरानो जीव प्यारा असेल तर परत फिरा ...." त्याच्या अश्या बोलण्याने सर्वांचे चेहरे भीतीने पांढरे ते पांढरेच पडून राहिले ..... परंतु हुशार अनिश त्याने त्याला सांगितल कि हल्ली या जागेमध्ये तर तशी काहीच घटना घडून आलेली नाहीये .. आणि तुम्ही जी गोष्ट सांगताय त्या गोष्टीला बराच काळ होऊन गेलाय मग घाबरण्याच काही कारण नाहीये ... काय यार तुम्ही सगळे उगाच घाबरता आहात ..."
हे काका स्टोरी सांगतायत आणि तुम्ही त्याला खर समजून बसताय ... कमोन ग्रो अप गाईज.... चला स्टेशन आल आहे उतरायचं आपल्या सर्वाना...स्टेशन जस जस जवळ येत होत तस तस दाट धुक दाटून येत होत ... सर्वांनी पटपट आपल्या बँगा उचलल्या पण तसेच माग ते जोडप राहील होत ... त्यांच्या सीटवर बसून ते दोघे एका दीर्घ विचारात गुंगले होते .... कारण थोड्यावेळ पूर्वी त्या वृद्धाने न जाणे कुठली कथा सांगितली त्यांना आणि घाबरवून सोडले ते ऐकून त्यांची जागची उठण्याची तयारीच होईना .... दाट धुक्यामध्ये संध्याकाळच्या वेळी....
गाडी स्टेशनवर पोहोचली .... धुक्याला चिरत गाडी जेव्हा स्टेशनवर येऊन थांबली तेव्हा ...ते ओसाड पडलेलं स्टेशन एखाद्या स्मशानापेक्षा कमी वाटत नव्हत ... आणि स्टेशनवर हातात बंद पडलेला कंदील घेऊन विजू त्यांचा गाईड उभा होता ....थोडासा ठेंगणा डोक्यावर थंडीपासून वाचण्यासाठी वुलनची टोपी...
सोबतच विजेचा कंदील होता त्याच्या हातात ... गाडी येताच त्याची थोडी हालचाल सुरु झाली .... एक एक डबा तो पाहू लागला...ते स्टेशन देखील अश्या निर्जल ठिकाणी होत कि तिथ कोणाची उतरायची तयारीच नव्हती वाटल होत एखाद दुसरा प्रवासी उतरेल पण नाही ...अचानक विजू च लक्ष एका डब्याच्या दाराकड गेल कारण तिथून काही बँग बाहेर पडल्या होत्या.. आणि पटापट त्या मधून तरून मुलांचा ग्रुप उतरला .. त्यांना पाहून विजू गाईडच्या लक्षात आले कि हेच लोक असणार ते ....
कारण त्याला का माहित होत वाटत या ठिकाणी क्वचितच एखाद दुसरा इसम उतरतो.... असा संघ नाही ... दुरूनच त्याने हेरले कि हि तीच माणसे होती ज्यांची तो अपेक्षा करत होता .... धुक दा ट काहूर माजवणार होत ... मुल खाली उतरली आणि त्यांच्या मागोमाग उतरला तो राकेश जाकेट वाला ... आणि मग क्रमाने शेवटी उतरले ते नवविवाहित जोडपे ... त्यांच्या चेहऱ्यावर एक भीती आणि शंका दाटून आलेली दिसून येत होती त्यांच्यात पावलात एक डगमग होती आणि त्यांच्या नजरा एकमेकांना पाहत होत्या...
तरीही खाली उतरलेली मुले त्यांना पाहून म्हणाली... "अहो कसला विचार करताय ...? हे स्टेशन लास्ट आहे ... ट्रेन आता परत जाईल...या लवकर ट्रेन सुटायच्या आतमध्ये..." त्या दोघांच्या हि मनामध्ये...बरेच असे प्रश्न त्यांना भेडसावून सोडवत होते .... तरीही मुलांच्या आग्रहावरून ते दोघे हि हातात हात घेऊन खाली उतरले... ते उतरले तशीच ट्रेन ने शिटी दिली आणि आली तश्याच परत वाटेला निघाली....त्यावर विद्या आपल्या पती सागरला म्हणाली . "सागर ... ? "
"हा विद्या बोल न ?" "आपण इथे येऊन चूक तर नाही न केली ....? खूप वेगळ वाटतय इथ .... बघ न कस निर्जल ठिकाण आहे हे .... अस वाटतय चारी बाजूनी घेरून घेतल आहे या दाट धुक्यांनी ... वाटत कोणीतरी वावरत आहे आजूबाजूला पण दिसत नाही.... " त्यांच्याच समोर उभे असलेले हे सात हि जन आणि राकेश.... या दोघांनाही थबकून पाहतच राहिले होते.... कारण विद्याच्या बोलण्यामध्ये तथ्य होत .... आजुबाजूच वातावरण देखील तसेच दाटून आणणार आणि जीव गुदमरून टाकणार होत....त्यावर संध्या पुढे आली आणि तिने विद्याच्या खांद्यावर हात ठेवला ..
"अहो काही नाही ... आता रात्र व्हायला येतेय न म्हणून... अस वाटून येत आहे ... इथ वातावरण थोडस धुक्याच आहे....सकाळी सर्व साफ दिसायला लागेल आणि प्रकाशात तुम्हाला बर हि वाटेल .... " अचानक तो ठेंगणा ठूस्का विजू संध्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला ... "होय मेडम .... एकदम फ्रेश हवा आहे बघा इथली .... सकाळी सकाळी तर आणखीनच फ्रेश ...चला मी तुम्हा सगळ्यांना तुमच राहायचं जागा दाखवतो ..."
असे म्हणत विजू गाईडने खाली हातात येईल तेवढ सामान उचलले आणि पुढे चालायला लागला .... तशी संध्या विद्या सोबतच चालत होती आणि सागर त्या दोघी सोबत ..... या सर्वांचा परिचय करून द्यायचा म्हटल तर ... संध्या... अत्यंत हुशार देखणी आणि सुंदर ... अतिशय सुंदर.... या सर्वात जास्त समंजस अशी तीच होती.... अजिंक्य फोटोग्राफर होता यांचं ग्रुपचा....तो जसा जसा जागो जाग जाईल तसा तिथले फोटो घेत होता.. राहुल अनिता दोघे हि मनमोकळे स्वभावाचे आणि विनोदी प्रज्ञा, विष्णू आणि अनिश तिघे हि याच मंडळाची सदस्य म्हणव लागतील....अनिशच मात्र संध्यावर जीवापाड प्रेम होत पण त्यान ते कधी दिसून येऊ दिल नव्हत ...
चला तर हा झाला यांचा परिचय...सर्वांनी आपापल सामान उचलले आणि तसेच चालत्या पावलांनी स्टेशन मधून बाहेर पडले ... बाहेर येतो न येतो तोच .... त्यांच्या डोळ्यासमोरच एक चकित करणार वाहन उभ होत ... काही घोडागाडी उभा होत्या त्यांना न्यायला आलेल्या .... संध्याकाळ उलटून रात्र व्हायला आली होती .... सगळ्या मुलांना आश्चर्य तसाच आनंद हि झाला ... "वाव यार ....| काय मस्त स्वारी आहे विजू ....एकदम भारी ...." असे म्हणत सर्व मुले पटापट गाडीमध्ये चढू लागली .... तोच ... "हे गाइज.... मी फोटो काढतो तुम्हा सर्वांचा .... बसून घ्या लवकर ...." अजिंक्य खाली उभ राहूनच ओरडला ...
"से चीज गाईज....." तसाच अजिंक्य ने फ्लेश चालू करून सगळ्यांचा एक फोटो क्लिक केला .... तसा स्वतः धावत येऊन गाडीमध्ये चढून बसला ... तीन गाड्या होत्या तश्या... एका गाडीमध्ये ... संध्या , आणि ते जोडप विद्या सागर... दुसऱ्या गाडी मध्ये अनिता,प्रज्ञा आणि अनिश आणि विष्णू बसले होते तर ....
शेवटच्या गाडीमध्ये ... राहुल , अजिंक्य तो राकेश आणि विजू गाईड असे बसले होते ....आधी पुढे जायला विजू गाईडची गाडी निघाली होती कारण त्याला त्या रेसोर्टचा रस्ता माहित होता ... तशी त्याची गाडी आधी निघाली .. मागोमाग संध्या आणि त्या जोडप्यांची गाडी व शेवटी अनिश प्रज्ञा अनिता विष्णू ...
गाडी निघता निघता अजिंक्य ने सवयी प्रमाणे ... कॅमेरा डोळ्यांवर लावला लेन्स फोकस केला आणि त्या स्टेशनचा देखील फोटो काढून घेतला.... आणि कॅमेरा बँग मध्ये टाकला... घोड्यांच्या टापानां लावलेली घुंगर या दोन्हीचा मिळून एक सूर बाधित आवाज येत होता....
काळ्या अंधाराच्या साम्रज्यात धुक्याच घनदाट वातावरण एखाद्या वाईट शक्तीला निमंत्रित करण्यासाठी अनुकूल होत...

गाडीने अंधारातूनच मजल दरमजल करीत रेसोर्टचा रस्ता गाठला.... घोडे अधून मधून काही हालचाली ऐकू आल्या कि खिः खी... किंचाळायचे.... त्यांच्या किंचाळन्याने गाडीत बसलेल्या मुली घाबरून जायच्या... एकदम विचित्र जागा होती ती... विजू गाईड तसा पुढे होता कारण त्याला रेसोर्ट कडे जाणारा रस्ता चांगला ठाऊक होता...
भयाण काळोखात पसरल होत ते जंगल.. अकृत विकृत आकारांची झाडे जणू सैतानी रूप घेऊन झडप मारायला आसुसली होती.... "सागर...? त्यावर त्याने तिला पाहिलं ..."
"हा विद्या ..."
"हे जंगल .... हि जागा हा परिसर .... मला खूपच वेगळ वाटतय हो इथे.... आजोबा म्हटले देखील होते इथे नका जाऊ.... "
"अग किती सुंदर वातावरण आहे ... आता सध्या रात्र झालीय दिवसा पहा किती प्रसन्न वातावरण असेल इथे..."
आणि अचानक गाडी एका ठिकाणी थांबली....मागे बसलेल्या सर्वांच्या नजरा समोर येऊन टिकल्या... आणि त्यांच्या पुढ्यात उभ होत ते भल मोठ रेसोर्ट आणि त्यावर लालबुंद अक्षरांमध्ये नाव कोरल गेल होत... MHE रेसोर्ट

क्रमश:

28/01/2017
13/12/2016
13/12/2016

Daughters!

07/12/2016

Local business

Hi friends we have started new service of designing and Printing invitation Cards for events... contact 9145373136
26/11/2016

Hi friends we have started new service of designing and Printing invitation Cards for events... contact 9145373136

26/11/2016

ये बात ! भारत माता की जय !

26/11/2016

❥●❥ ♥ ♥ ❥●❥

26/11/2016

Milega kya koi esa??

Rowhi Rai

26/11/2016
26/11/2016

This ❤

Address

Aurangabad
431001

Telephone

9145373136

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wisdom Events and Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category