डॉ.भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती

  • Home
  • India
  • Amravati
  • डॉ.भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती

डॉ.भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन कार्य पोहोचणे व 27 डिसेंबर 2023 रोजी 125 जयंती निमित् समारोह आयोजन

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी आपले स्वतःचे राहते घर श्री शिवाजी शिक्षण संस्था करिता म्ह...
02/11/2025

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी आपले स्वतःचे राहते घर श्री शिवाजी शिक्षण संस्था करिता म्हणजेच आपल्या पूर्वीच्या पिढीच्या शिक्षणाकरिता चार वेळा गहाण ठेवले होते...

01/11/2025
समस्त बहुजन समाजाचे जीवनमान उंचवण्याकरिता आपले आयुष्य व घर गहाण ठेवणाऱ्या डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी शेतकरी ...
20/10/2025

समस्त बहुजन समाजाचे जीवनमान उंचवण्याकरिता आपले आयुष्य व घर गहाण ठेवणाऱ्या डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी शेतकरी संघातर्फे दीप लावून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...

30/09/2025

घटस्थापना नवरात्र घटस्थापनेचा सण हा नवनिर्मितीचा उत्सव आहे हा भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेल्या सर्जनशील ते विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे त्यांच्याकडे असलेल्या या विशेष शक्ती मुळेच प्राचीन काळापासून भूमी आणि माता यांचे साम्य दाखवण्याचा प्रयत्न झाले आहेत भूमीला माता आणि मातेला भूमी मानण्याची घटना हा त्याचाच एक भाग होईल शिवाय शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असे त्या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे त्यामुळे हा उत्सव कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडवणार आहे तसेच स्त्रियांनी शेतीचा शोध ज्या क्षणी लावला त्या क्षणाचे दरवर्षी आनंद स्मरण करण्याचाही आशय घटस्थापने मधून व्यक्त होतो म्हणून आपण कट स्थापनेचा सण या दृष्टीने साजरा करावा या सणामागचा मूळ हेतू माता आणि भूमी यांच्या नवनिर्मितीचा गौरव करण्याचा असला तरी आपण आता या आशयाच्या कक्षा अनेक अंगांनी विस्तारायला हव्यात ही नवनिर्मिती केवळ भूमीशी आणि मातेचे जोडून मर्यादित करण्याऐवजी त्या निर्मितीच्या जोडीने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये काही ना काही नवीन निर्माण करण्याचा ध्यास बाळगणे आणि तो ध्यास सफल करण्यासाठी शक्यते सर्व प्रयत्न करण्याचा निश्चय करणे या दृष्टीने या सणाच्या प्रसंगी योग्य ती उपक्रम कृतीत आणावेत त्याबरोबर आजही शेतीच्या आधारे सर्व मानव जातीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणाऱ्या शेतकऱ्यांचा आधार सत्कार करणे आणि मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रभाव अखंडितपणे अस्तित्वात ठेवणाऱ्या स्त्रियांविषयी योग्य तो आदरभाव व्यक्त करणे या स्वरूपाचे उपक्रम या काळात आयोजित करावे नवरात्र नऊ दिवस साजरी करण्याऐवजी एक तीन वा पाच दिवस साजरी करण्याचा पर्याय स्वीकारता येईल या काळात निवृत्ती पासून त सावित्रीबाई फुले किंबहुना आजच्या समाज निर्मितीमध्ये तसेच कुटुंबामध्ये आपले योगदान देणाऱ्या स्त्रियां पर्यंत कृतज्ञता व्यक्त करणारे उपक्रम आयोजित करावेत..

21/09/2025

**डॉ.भाऊसाहेब देशमुख व सहकार क्षेत्र**. संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष , International year of Cooperation(IYC) म्हणून घोषित केले आहे.या वर्षाची थीम आहे. **सहकारी एक चांगले जग घडवतात**
यामध्ये शाश्वत विकास, गरिबी निर्मूलन, सर्वसमावेशक आर्थिक विकासा करता सहकारी संस्थांची योगदान अधोरेखित करणे होय. वास्तविक सहकाराची कल्पना गोड व महान आहे. भारतात ही चळवळ प्रामुख्याने कर्जमुक्ती करिता पुढे आली. १९०१ मध्ये "दुष्काळी कमिशन " खेड्यां मधील कर्जबाजारी पणाचा अभ्यास शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याकरिता सहकारी पतपेढी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यानुसार १९०४ मद्रास येथे या कार्याचा शुभारंभ झाला. १९१२ ला सहकार विभाग हा मध्यवर्ती शासन ऐवजी प्रांतीय मंत्र्यांच्या हाती सोपवण्यात आले. आपण त्यावेळी मध्य प्रांतात म्हणजे सी.पी. अँड बेरर यामध्ये होतो त्या प्रांताचे डॉ.भाऊसाहेब हे दिनांक १४ डिसेंबर १९३० रोजी शिक्षण, शेती, लोक कर्म व सहकार विभागाचे मंत्री झाले. भाऊ साहेबांच्या शिक्षण व शेती या महत्त्वाच्या खात्या ंमुळे सहकार खात्याकडे पाहिजे तसे लक्ष त्यांना पुरवते आले नाही, तरी त्यांनी २१/०१/१९३२ रोजी *कॉटन मार्केट बिल* सादर केले. यामध्ये कॉटन मार्केट कमिटीच्या कार्यामध्ये आमुलाग्र सुधारणा केल्या. तत्कालीन सरकारच्या १९०१ धोरणानुसार अमरावती येथे २४/०२ /१९१२ रोजी दीं.अमरावती सेंट्रल को.-ऑप. बँक लिमिटेड(ADCC )ही सहकारी संस्था समाजातल्या प्रतिष्ठित, श्रीमंत व्यक्तींनी सुरू केली,याचा उद्देश होता की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करणे व जीवनमान उंचावून शाश्वत विकास करणे. परंतु आर्थिक धोरणामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे दुष्टचक्र सुरू झाली. उत्पन्न कमी झाले कापसाचे भाव २५० वरून 30 रुपये खंडी इतके कमी झाले. कापूस उत्पादक शेतकरी कर्जाच्या दृष्ट चक्रात सापडले या दुष्टचक्रातून या सहकारी संस्थेने सोडविणे अपेक्षित होते परंतु तत्कालीन काही पदाधिकाऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी, बैलगाड्या, जोड्या, दुभत्या गायी , म्हशी जप्त करून पाहिजे तशा भावात विकत घेणे सुरू केले शेतकऱ्यांची पिळवणूक केली. सहकाराचा सहारा राहिला नाही या सगळ्या बाबी भूमिपुत्र भाऊसाहेबांच्या नजरेआड होणे शक्य नव्हते. आपल्या बांधवांना दुष्टचक्रातून सोडवीण्या करिता बँक ताब्यात घेणे गरजेचे आहे हे लक्षात आले. भाऊसाहेब बँकेचे सदस्य सुद्धा नव्हते त्यांनी प्रारंभी उमर टेक च्या सोसायटीत सदस्यत्व मिळवले व बँकेतील गैर कारभारा बद्दल आपल्या मित्रांची चर्चा करून, गावोगावी दौरे काढून सदस्यांमध्ये नव्या विचारांची लाट उठवली. बँकेच्या सहकाराच्या धोरणा विरुद्ध नागवला गेलेल्या अनेक शेतकऱ्यांनी साथ दिली या कार्याला बँकेचे कार्यवाह मो.ह. पांडे यांनी "भोळा शेतकरी"या मासिकातून या परिवर्तनाला साथ दिली. बँकेचा आमसभे चा दिवस उजाडला या सभेच्या दिवशी जिल्हाभरातून लुटले गेलेले अनेक शेतकरी सभासद सभास्थळी दाखल झाले. विरोधकांच्या विरोधानंतर त्यांनी सभागृहात प्रवेश मिळवला व कामकाजात हस्तक्षेप केला विरोधकांनी अनेक क्लुप्त्या वापरल्या परंतु इतक्या मोठ्या शेतकऱ्याच्या समोर हतबल झाले. शुभ रात्री १२ वाजेपर्यंत चालली व निवडणुकीमध्ये भाऊसाहेबांच्या २७ पैकी १८ लोक निवडून आले व भाऊसाहेब स्वतः ९५ मतांनी निवडून आले.*१९३४ ला भाऊसाहेब बँकेचे अध्यक्ष झाले** परंतु विरोधकांनी या भूमिपुत्रा च्या शेतकरी हिताच्या कार्यास बाधा आणण्याकरिता ठेवी परत घेणे सुरु केले व बँक डबघाईस येत आहे अशी चर्चा केली.
परंतु भाऊसाहेब यांनी दी. सेंट्रल प्रॉव्हीनन्स अँड बेरार प्रायव्हेट बँक लिमिटेड( शिखर बँक) यांच्याकडून सुमारे ०४ लाखाचे कर्ज घेऊन ठेवीदारांना ठेवी परत केल्या व बँकेची पत कायम ठेवली. ज्या उद्देशाने भाऊसाहेब अध्यक्ष झाले होते त्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवी ने करिता त्यांनी "चौकशी समिती" नेमली व कर्जाची पुनर्रचना करून व हप्ते यांचा ताळमेळ बसविला व बँके शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविल्या. अशा रीतीने भूमिपूत्रांना भूमीहीन होण्यापासून वाचवले. भाऊसाहेब बँकेचे अध्यक्ष असताना अमरावती मधील कॉटन कमिटी मध्ये एकाधिकारशाही सुरू होती ती भाऊसाहेबांच्या नजरेआड होणे शक्य नव्हते. भाऊसाहेबांनी मंत्री असताना "कॉटन कमिटी सुधारणा बिल" आणले होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यावेळी भाऊ साहेबांनी आपले सहकारी सेठ रामनाथ बियाणी यांना अध्यक्ष करून कॉटन कमिटी मध्ये १९३७ साली प्रवेश केला यावेळी भाऊसाहेब फक्त संचालक होते. सेठ रामनाथ बियाणी यांनी अनेकदा त्यांना अध्यक्ष होण्याकरिता विनवण्या केल्या परंतु भाऊसाहेबांनी दूरदृष्टी पणे सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकऱ्यांचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. सेठ रामनाथ बियाणे म्हणतात.. "माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणस सोबत भाऊसाहेबां सारखा उच्चशिक्षित माणूस काम करतो आहे यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते.... रामनाथ शेठ यांच्या १९३७ ते १९४७ च्या कारकिर्दीमध्ये शासकीय निरीक्षणा मध्ये त्यांना "उत्कृष्ट सेवा" असा शेरा मिळाला तसेच ०३ वर्षांनी होणारी निवडणूक कधी झालीच नाही. त्यांना "रावसाहेब" किताब व "चेअरमन" चा सन्मान मला भाऊसाहेबां मुळेच मिळाला असे ते नेहमी सांगत. शेठ रामनाथ बियाणी यांना अध्यक्ष करताना हा मारवाडी समाजाचा माणूस आपल्या हिताचे काम करणार नाही असे अनेक सहकारी सांगत परंतु भाऊसाहेब म्हणाले.. "कुठल्याही जाती-जमातींनी सद्गुण व दुर्गुणांचा ठेका घेतला नाही. कोणीही खरा माणूस मला माझ्या इतकाच प्रिय आहे. तसेच अनेक अशिक्षित सुद्धा या जगात थोर कामे केलेली आहे.. यावरून भाऊसाहेबांच्या सहकार मधील विविध गुणांची प्रचिती आपणास होते. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने "सहकारी हे एक चांगले जग निर्माण करू शकतात" या उक्तीप्रमाणे भाऊसाहेबांनी फक्त शेतकरी समाजातच नव्हे तर इतर अनेक जातींच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन येथील भूमिपुत्रांचे चांगले जग निर्माण केले असे आपणास म्हणता येईल..... मनीष पाटील (पथरोटकर)9420714415

19/09/2025

**डॉ भाऊसाहेब देशमुख व विरोधी पक्षाचे उमेदवार**. सध्या महाराष्ट्रातील राजकारणी हे अत्यंत हीन पातळीचे बोलताना व वागताना दिसत आहे. त्यांना विरोधी पक्षाचे नेते म्हणजे शत्रू वाटतात त्यांना शत्रू व विरोधक या मधला फरक समजलेला नाही किंवा समजून घेतलेला नाही किंवा दिलेला नाही असो.. विरोधकासोबत कोणत्या पातळीवर संबंध असले पाहिजे याची उदाहरण देताना स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी व स्वर्गीय राजीव गांधी त्याचप्रमाणे स्व. यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय प्र. के. अत्रे यांचे सुद्धा दिले जाते. असेच उदाहरण भारताचे प्रथम कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या बाबत चे आहे आपल्याला नमूद करणे आवश्यक आहे.डॉ. भाऊसाहेब देशमुख हे ब्रिटिश कालीन शिक्षण मंत्री होते. १९३७ ला मध्य प्रांतात C.P. अँड Berar कायदेमंडळाच्या निवडणुका आल्या यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेतकरी संघातर्फे उमेदवारी होती संपूर्ण मतदारसंघात प्रचाराच्या जाहीर सभा सुरू होत्या अशीच सभा आष्टी (सद्याचे ता.अमरावती ) झाली. ही सभा सायं ६.०० वाजेपासून दोन तास चालली ही सभा आटपून डॉ. पंजाबराव अमरावतीला परत येत होते. वलगाव जवळ काँग्रेस उमेदवाराची मोटर नादुरुस्त झाली मोटारीत श्री शिवाजीराव पटवर्धन आणि त्यांचे चार सहकारी मित्र होते ठरलेल्या रात्री १० सभेला ते आष्टीला पोहचू शकत नव्हते. आष्टीवरून येणारी ही मोटर त्यांनी थांबवली ती निघाली डॉ.पंजाबराव यांची पंजाबराव मोटरीतून उतरले आणि म्हणाले काय डॉक्टर काय अडल ?डॉ.शिवाजीराव पटवर्धन म्हणाले.. भाऊसाहेब आष्टीला आता १० वाजताची आमची सभा आहे. ही मोटर नादुरुस्त झाली, आमची मोटर येथेच टाकून देतो ड्रायव्हर पाहील गाडी.आम्ही तुमच्या मोटारीत अमरावतीला परत येतो. त्यावर डॉ. पंजाबराव म्हणाले... कशाला येता परत असं करा ही माझी गाडी घ्या आणि तुमची सभा तुम्ही पार पाडा मी माझी सभा पार पाडून आत्ताच आलो आहे माझं काम झालंय तुमचं काम तुम्ही करा. डॉ. पटवर्धन म्हणाले.. हे कसे शक्य आहे ? आम्ही परत येईपर्यंत काय तुम्ही इथेच बसणार.. डॉ. पंजाबराव म्हणाले... तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही टॅक्सीने गाडीने अमरावतीला जातो परतवाड्यावरून येणाऱ्या गाड्या अर्ध्या तासाने मिळतात. खरोखरच डॉ. पंजारावांनी आपली स्वतःची गाडी विरोधी पक्षाचे उमेदवार यांना दिली व स्वतः टॅक्सी गाडीने अमरावतीला परत आले.विरोधी पक्षाशी इतक्या सभ्यतेने वर्तन करणारे ते राजकारणी पुढारी कसे व आजचे याचा विचार आपल्यासारख्या सुशिक्षित मतदारांनी करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपली ही लोकशाही अबाधित राहू शकते अन्यथा या लोकशाहीचा खेळ मांडणारे जे नेते आहे ते या लोकशाहीचे लक्तरे वेशीवर टांगतील हे निश्चितच.... मनीष पाटील (पथरोटकर) संदर्भ जागतिक कृषी क्रांतीचा विधाता लोकनेता डॉ.पंजाबराव देशमुख लेखक:- विर उत्तमराव मोहिते

26/06/2025

डॉ.भाऊसाहेब देशमुख यांचे अमरावती येथील निवासस्थानी स्मृतिस्थळ व अभ्यासिका होणार..

02/02/2025

**डॉ.भाऊसाहेब देशमुख व पत्रकारिता**
त्यावेळी ब्राह्मण व ब्राह्मणोत्तर असे दोन पक्ष होते. ब्राह्मणेत्तर पक्षाने म्हणावे तसे शेती व शेतकरी या समस्यांकडे विशेष लक्ष पुरवले नाही .शेती व शेतकरी यांच्या समस्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या डोक्यात थैमान घातले होते. बॅरिस्टर मोतीराम जी तिडके यांचे कडचे लग्न वर्धा इथे कांदे गावचे विश्वनाथ भुमरे यांच्या घराण्यात जमले या लग्न सोहळ्यात सारी मंडळी जमून याच लग्नाला शेतकरी अधिवेशनाचे स्वरूप दिले.
या अधिवेशनात भाऊसाहेबांनी शेतकरी वर्गाच्या विविध समस्या अधिवेशनापुढे मांडल्या त्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपली संघटना असावी म्हणून या अधिवेशनाने **शेतकरी संघ*" हा नावाचा पक्ष स्थापन केला .शेतकरी संघ संपूर्ण विदर्भात गाजू लागला. त्याचवेळी वर्धा,चांदा, यवतमाळ, देवळी, वायगाव, रेवसा, इत्यादी ठिकाणच्या शेतकरी परिषदा चांगल्या गाजल्या. याशिवाय कुणबी परिषद ,अचलपूरची माळी, परिषद ,ब्राह्मणोत्तर परिषद, बेनोशाची वडर परिषद, शिंगणापूरची पारधी परिषद, या सर्व अधिवेशनाचे मार्गदर्शन व संचालन स्वतः डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केले. जणू काही सर्व मागासलेल्या जाती-जमातींच्या जागृतीचा विडा डॉ.पंजाबराव देशमुख यांनी उचलला होता. यात त्यांना निषिद्ध असे काहीच वाटले नव्हते. मागासलेल्या सर्व जाती एकाच वर्गात मोडतात असा त्यांचा समज होता. 1957 ला छत्तीसगड विभागातील धम्मतरी ला सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांना पाचरण करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन पुण्याचे भाऊ साहेबांना सामाजिक चळवळीचा झेंडा फडकविण्या साठी स्वतःच्या नियतकालिका ची निकडी ने आवश्यकता वाटू लागली. म्हणून अमरावतीला महिपत राव कुरकुरे यांच्या विदर्भ प्रेस मध्ये त्यांनी **महाराष्ट्र केसरी* नावाचे वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्र केसरीच्या डोक्यावर **बहुजन सुखाय बहुजन हिताय** असे घोषवाक्य होते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या बहुजन समाजाचा अर्थ कष्टकरी समाज असाच होता. महाराष्ट्रात केसरी या नावाखाली छत्रपती शिवरायांचे चित्र होते. चित्रा खाली समता स्वातंत्र्य व बंधु प्रेम छापले होते. मुखपृष्ठाच्या पानावर **दृष्टीसमोर समता ठेवी स्वातंत्र धरी शिरी !
बंधुप्रेमा मागे लावी,
महाराष्ट्र केसरी !!
या कवितेत शेतकरी संघाच्या तत्त्वज्ञानाचे ध्येय निष्ठेचे सूत्र शब्दबद्ध करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरीचे संपादक मोर्शी चे शामराव यादवराव गुंड होते. महाराष्ट्र केसरीचा संपादक अत्यंत व्यासंगी आणि सामाजिक क्रांतिकारक विचार प्रणालीचा पुरस्कार करणारा होता.अत्यंत प्रामाणिकपणे कोणाची भीड न ठेवता आणि जातीय
प्रतिक्रियावाद्यांची कोणतीही तमा न बाळगता महाराष्ट्र केसरी मध्ये क्रांतिकारक आणि स्फोटक लिखाण प्रसिद्ध होत असे. आर्मीचे दलपतसिंग चव्हाण यांचे महाराष्ट्र केसरी तील अभ्यासू लेख वाचकांना फार आवडत. त्यावेळचा अमरावती डिस्ट्रिक्ट कौन्सिल मध्ये गोसावी नावाचे लियासन ऑफिसर होते ते महाराष्ट्र केसरीच्या ऑफिसमध्ये खूप काम करत असत.
०१ ऑक्टोंबर १९४७रोजी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीला **संदेश** नावाचे साप्ताहिक सुरू केले. मध्य प्रांत वऱ्हाड चे राज्यपाल मा. मंगलदास पक्कासा यांच्या हस्ते श्री शिवाजी महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला.त्या समारंभ संदेशच्या शेकडो प्रति वाटण्यात आला. पहिल्याच अंकातील मुखपृष्ठावर सौ वत्सला वहिनीं चे आमदार बि. के. देशमुख यांना पत्र आले होते .वहिनींच्या या पत्राने साऱ्या विदर्भात संदेश चे नाव गाजले. अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या स्मृति निमित्य डॉ. पंजाबराव देशमुखांनी संदेश हे आवडीचे नाव नवीन वृत्तपत्राला दिले होते .अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या संदेश प्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुखांच्या संदेश चा विदर्भाच्या आठ जिल्ह्यात चार वर्ष दरारा होता. अच्युत बळवंतराव कोल्हटकर करांच्या दीदी तू रडतेस का बळवंतराव टिळक बाळंतीण झाले ,इत्यादी लेखा प्रमाणे संदेशच्या अग्रलेखांनी प्रति ग्राम यांचे धाबे दणाणले होते.
धातरवाड्याचे विष्णुपंत माणिकराव देशमुख संदेश चे संपादक होते. विर उत्तमराव मोहिते, ऍड रंगनाथ चौबळ मारुतराव तात्याजी ठाणेकर प्राचार्य एन सी देशमुख, प्राध्यापक शेंडे संपादक मंडळात होते. सौ .वनमाला अनिल कुमार व नागराचार्य या टोपण नावाखाली प्रसिद्ध झालेले लेख फार गाजले. महात्मा गांधी सदैव वैकुंठाला गेले आता तरी डोळे उघडा, वा महाराष्ट्र ,आता प्रायश्चिताचे ढोंग कशाला, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मोटाराला ब्रेक नाही, हिम्मत असेल तर बसा, ना द्वारका प्रसाद मिश्रा जी नर्मदेच्या खाली तोंड खूपसू नका, दुखते कुठे सांगते कुठे, अमरावतीच्या जगदंबेच्या होत्युर लागलं, हिंग लेवे पपीता लेख सालम मिश्री लेव, लोकशाही आघाडीचा जाहीरनामा,अशा एक नाही शे शेकडो लेखांनी प्रती ग्रामी सोहळ्या जातीवाद्यांची संदेश ने भंबेरी उडून दिली पांढऱ्या कपनेतील काळी कारस्थाने, मातृभूमीचा मारवाडी रक्ताला लालचावला,आता कशाला उद्याची बात, बघ निघू नी चालली रात, संदेशच्या या लेखांनी राजकीय क्षेत्रात विक्रम करून सोडला होता. संदर्भ:- जागतिक कृषी क्रांतीचा विधाता लोकनेता डॉक्टर पंजाबराव देशमुख.

डॉ.भाऊसाहेब देशमुख रचित तुकाराम महाराज अभंग....
02/02/2025

डॉ.भाऊसाहेब देशमुख रचित तुकाराम महाराज अभंग....

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ.भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share