Suvir Patil We provide all types of Security and Bouncers services

27/10/2024
03/07/2023

ll गुरुपौर्णिमा ll

" स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात
स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात
त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात.”

आषाढ पोर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपोर्णिमा असे म्हणतात. गुरू या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरूला देवतुल्य मानले, त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरू भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण, महाभारतातील आदर्श आजही युवकांना नव दिशा देतात. आई- वडिल पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात.
गुरु परमात्मा परेषु प्रत्येक विध्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरू-शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरू-शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरू असतो. खरचं मित्रांनो,
आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञाना- मुळे प्रगती झाली आहे. तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरू-शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे 'गुरु बिन कौन बतावे बाट' या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व घडून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार.......
विध्यार्थी मित्रांनो गुरू म्हणजे काय? जगातल दुःख नाहीसे करण्याची ती शक्ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हे हृदय म्हणजेच गुर ... शिष्य म्हणजे काय ? शिष्य म्हणजे विध्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक बी आहे की, ज्या जमिनीत तुम्ही पेराल, तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस . जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक- आयुष्य जगत असतांना आपल्याला गुरूने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरीत करायला हवे. हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरूदक्षिणा ठरेल.

ll गुरुपौर्णिमा ll
निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा...!💐🤝🍫

29/08/2016

Adresse

Kande Marathi School
Kande
414415

Téléphone

9665088981

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque Suvir Patil publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Partager