31/08/2024
क्वीन्स क्लब व दैनिक दिव्य मराठी यांच्या आईचा गणपती या इको फ्रेंडली गणपती वर्कशॉपमध्ये आई व मुलांनी गणेशमूर्ती साकारल्या
शुक्रवारी संध्याकाळी विजापूर रोड वरील मयूर क्लासिक AC बँक्वेट हॉल मध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण संरक्षणाची गरज ओळखून क्वीन्स क्लब आणि दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्कशॉप घेण्यात आला. कला प्राध्यापक श्री. आशिष माशाळे यांनी मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
सर्व माता आणि बालकांनी पुन्हा पुन्हा क्वीन्स क्लबचे आभार मानले