06/12/2024
महाराज, तुमच्या या मावळ्यांना माफ करा.....
तुमचे मावळे आज कमी पडले व हारले ......
महाराज, तुमचा शेकडो वर्षे कधीही जगासमोर न आणला गेलेला इतिहास आम्ही जगाला दाखविण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला.
खरंतर,
२२ नोव्हेंबर रोजी आपला 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' चित्रपट प्रदर्शीत झाल्यापासून दिवसागणिक जनतेचं अफाट प्रेम महाराज तुमच्या या कलाकृतीला मिळालं. चित्रपट पाहताना चित्रपटगृहात लोक अक्षरशः धाय मोकलून रडत होते..
शाळांचा तर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या राजाचा हा इतिहास पाहण्यासाठी ओघ लागलेला होता..
चित्रपट आपल्या जनतेपर्यंत सगळीकडे पोहोचत असतानाच आज चित्रपटगृहात 'पुष्पा' रुपी "औरंगजेब " आला आणि सगळ्यावर पाणी फिरवून गेला.....
चित्रपटाला प्रेक्षकवर्गाचा रिस्पॉन्स नसता तर एक वेळ गोष्ट मान्य असती पण प्रेक्षकवर्गाचा प्रचंड रिस्पॉन्स आणि अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दीत सुरु असणाऱ्या आपल्या या ऐतिहासिक मराठी पिक्चरला ऐन बहराच्या वेळी आपल्या स्वराज्यातच, महाराष्ट्रातच 'पुष्पा' रुपी औरंगजेबापुढे स्क्रीन्स मिळत नाहीत.. शो दिले जात नाहीत..
हे जर असेच चालत राहिले तर येत्या काही दिवसात मराठी चित्रपट हे चित्रपटगृहात न्हवे तर फक्त युट्युबरच बघायला मिळतील..
" महाराज "आजवर आपला इतिहास न भूतो न भविष्यती असा चित्रपटाच्या माध्यमातुन भव्य दिव्य स्वरूपात संपूर्ण जगाला दाखविण्याची जी छोटीशी सेवा आपण आमच्याकडून करून घेतलीत त्यासमोर अखेर आज 'पुष्पा' रुपी औरंगजेबाने येऊन उभा ठाकलायं..
महाराज, तुम्ही औरंगजेबाला रोखू शकलात.. पण आज 'पुष्पा' रुपी
" औरंगजेबाला "रोखून धरण्याची ताकद तुमच्या या मावळ्यांत नाही..
त्यामुळे, महाराज, तुमच्या या मावळ्यांना माफ करा..
तुमचे मावळे आज कमी पडले.....
आपलेच मावळे,
" टीम धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज "