Rutugandh Production

Rutugandh Production we arrange all types of entertainments programs, events, celebrity shows

*ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करु!**नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही**ऑल आर्टिस...
02/08/2024

*ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करु!*

*नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही*

*ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र चा स्नेह मेळावा संपन्न*

ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्राची ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र ची मागणी रास्त आहे. त्यामुळे फाउंडेशन ने यासाठी जागा सुचवल्यास, त्याच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच, ज्येष्ठ कलाकारांच्या समस्यांसंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत लवकरच बैठक करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर, मेलडी मेकर्स चे अशोककुमार सराफ, ज्येष्ठ कलावंत सुनील गोडबोले, रजनी भट, जयमाला इनामदार,प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील,सुबोध चांदवडकर, इकबाल दरबार यांच्या सह संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्रांची संघटनेची मागणी अतिशय रास्त आहे. या मागणीसाठी संघटनेने जागा सुचविल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करु. तसेच, त्यांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु. जेणेकरून ज्येष्ठ कलाकारांना त्यांचे उपक्रम राबविणे सहज शक्य होईल.

तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या इतरही अनेक समस्या निवेदनाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात लवकर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक घेऊन, त्याचीही सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी ज्येष्ठ कलाकारांच्या पेन्शनच्या विषयात महायुती सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत, भरघोस वाढ केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार मानले. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, लक्ष्मीकांत छाबिया यांनीही मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी ज्येष्ठ कलाकारांच्या विमा कार्डचे आणि नवनियुक्त कार्यकारीणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्राचे वाटप नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

कलेच्या विविध घटकासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या जितेंद...
16/07/2024

कलेच्या विविध घटकासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या जितेंद्र भूरूक प्रस्तुत ब्रांज बोनांजा या कार्यक्रमाला पुणेकर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, संस्थेचे सभासद असलेल्या सर्व नामवंत कलाकारांनी उत्कृष्ट वादनाबरोबरच, गायकांच्या उत्कृष्ट गायनाने तर प्रसिद्ध गायक जितेंद्र दादा भरूक यांनी आपल्या सदाबहार आवाजाने चार चांद लावले, या कार्यक्रमातून जमलेल्या निधीचा संस्थेच्या सभासद कलाकारांच्या भविष्या करीता सदुपयोग केला जाईल, याच कार्यक्रमात दिवंगत लोकधारा निर्माता स्व.धनंजय गायकवाड यांच्या कुटुंबियांना फाऊंडेशनने केलेल्या गेल्या वर्षभराच्या अथक प्रयत्नाने ,पाठपुराव्याच्या माध्यमातून देण्यात आलेला अडीच लाख रुपयांचा धनादेश पाणवलेल्या डोळ्याने स्वीकारताना त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व मान्यवर व रसिक प्रेक्षक.....
या कार्यक्रमाच्या वेळी श्री दीपक भाऊ मानकर , श्री दत्ताभाऊ सागरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, राष्ट्रवादी शरद क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी खाबिया, चंदूकाका सराफ अँड सन चे सिद्धार्थ जी शहा, अभी ग्रुप ऑफ इंडस्ट्री चे अभिषेक जी जोशी, सुनील जी पवार, साऊंड लाईट असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांच्यासह पुणे शहरातील सर्व कलाकार उपस्थित होते..... स्वागत संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी करून आभार रशीद शेख यांनी मानले.....

कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून गरजू कलावं...
12/07/2024

कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून गरजू कलावंतांसाठी मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून मदत निधी करिता या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे, तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या सत्कार्यास हातभार लावावा ही नम्र विनंती 🙏

कलेच्या विविध घटकासाठी कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने पुण्यनगरी मध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी शहरातील विव...
01/07/2024

कलेच्या विविध घटकासाठी कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने पुण्यनगरी मध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी भाव भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे निखळ मनोरंजन केले... .... त्यातील पहिला कार्यक्रम फाउंडेशनचे सल्लागार प्रसिद्ध निवेदक संदीपजी पाटील तर फाउंडेशनचे संचालक सोमनाथजी फाटके यांनी दत्तवाडी येथे दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले..... वारकऱ्यांनी दिलेली टाळ्यांची भरभरून दाद..... हाच खरा पांडुरंगाचा आशीर्वाद ......... याप्रसंगी फाउंडेशनचे संचालक, सदस्य आणि वैष्णवांचा मेळा उपस्थित होता..... आदर्श नगरसेवक राजेश येनपुरे यांच्यासह अभिजीत बारवकर यांचे आभार ...... राम कृष्ण हरी.... जगात भारी पंढरीची वारी

30/06/2024
भेटी लागे जीवा लागलेसी आस........ जगात भारी माझी पंढरीची वारी,  राम कृष्ण हरी..... 🙏
30/06/2024

भेटी लागे जीवा लागलेसी आस........ जगात भारी माझी पंढरीची वारी, राम कृष्ण हरी..... 🙏

Hosting Balgandharva Festival pune.....
28/06/2024

Hosting Balgandharva Festival pune.....

मान्यवर मित्रवर्य नगरसेवक श्रीकांतजी जगताप आणि सौ.श्रावणी श्रीकांत जगताप आपले मनापासून आभार.......
23/06/2024

मान्यवर मित्रवर्य नगरसेवक श्रीकांतजी जगताप आणि सौ.श्रावणी श्रीकांत जगताप आपले मनापासून आभार.......

आचार्य अत्रे प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा आयोजित आचार्य अत्रे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त आचार...
13/06/2024

आचार्य अत्रे प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा आयोजित आचार्य अत्रे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयराव कोलते यांचे मनापासून आभार ....... अभिनेता दिग्दर्शक केदारजी शिंदे यांच्यासह आचार्य अत्रे यांचा सहभाग ज्यांना लाभला ते आदरणीय श्री बाबुरावजी कानडे यांनी दिलेला आशीर्वाद हा प्रेरणादायी आहे........ 🙏

Address

Pune
411051

Telephone

+919075021152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rutugandh Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rutugandh Production:

Share