S. S. Photography

S. S. Photography Love to capture your memory for lifetime..................

16/09/2025
13/01/2025
27/09/2024

*चोर या विषयावर निबंध👇*😊😇🤪😀😁

"चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे"

लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा,

चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,

चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,

चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,

चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत,मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,

चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,

चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,

चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.

मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नविन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,

चोर शब्दामुळे भाषेतील साहित्याकृतीं मध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे.
अलीबाबा चाळीस चोर ही कथा, प्रेम कथांमध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष, चित्तचोरटी,क्रिकेट मधील चोरटी धाव व चोराची आळंदी हे गाव... यासारखे शब्दप्रयोग याची सर्वश्रुत उदाहरणं आहेत.

चोराच्या वाटा चोराला ठाऊक/चोरावर मोर/चोराच्या मनात चांदणे/चोर सोडून संन्याशाला सुळावर देणे/काडी चोर तो माडी चोर /चोराच्या उलट्या बोंबा/चोरांच्या हातची लंगोटी/चोर तो चोर वर शिरजोर/चोर चोरी से जाये पर हेरा-फेरी से न जाये...या सारख्या अनेक म्हणी...

चित्रपटसृष्टीला अर्थ, प्रसिद्धी मिळवून देणारे चोरी मेरा काम/ चितचोर/चोर मचाये शोर/ चोरोंकी बारात यासारखे अनेक लोकप्रिय चित्रपट...अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या *"चोर"* या शब्दाचं सहाय्य मिळालं आहे.

*राजकीय चोरांमुळे मात्र अर्थ व्यवस्थेला कोणताही फायदा नाही.*

ते फक्त स्वतः साठीच जगत असतात.

😜😂😜😂😜😂😜

टीपः लेखक माहित नाही. लेखकाने बहुदा economics ची डिग्री धेतली असावी. नोकरी न मिळाल्याने “चोर” हा व्यवसाय निवडला असावा. मग तुरूंगात गेल्यावर टाईमपास म्हणून वरील निंबध लिहला असावा.

Address

Dombivali
Dombivli
421202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S. S. Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share